Pune Garware College Video Sakal
पुणे

Pune Crime: कोयता घेऊन विद्यार्थ्यांना धमकावणाऱ्यांची पोलिसांनी कॉलेजमध्येच काढली धिंड; पुण्यातील प्रकार | Video Viral

दत्ता लवांडे

Pune Crime News : मागच्या काही दिवसांपासून पुण्यामध्ये कोयता गँग सक्रीय झाल्याचं दिसून येत आहे. सदाशिव पेठ येथे एका महाविद्यालयीन तरूणीवर झालेल्या कोयता हल्ल्याने पुणे हादरले होते. त्यानंतर आता कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना सुरा आणि कोयता घेऊन धमकावणाऱ्यांनी उच्छाद मांडला आहे. या गुंडांना पोलिसांनी चांगलाच धडा शिकवला आहे.

अधिक माहितीनुसार, पुण्यातील आबासाहेब गरवारे महाविद्यालयात कोयता आणि सुरा घेऊन विद्यार्थ्यांना धमकवणाऱ्या टोळीवर पोलिसांकडून कारवाई करण्यात आली असून त्यांची कॉलेज मध्येच धिंड काढण्यात आली आहे. या गुंडांमध्ये ९ जणांचा सामावेश असून त्यामधील २ जण हे याच महाविद्यालयात शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली आहे.

विद्यार्थ्यांना धमकावणे तसेच त्यांच्याकडून पैश्याची मागणी करणे असे कृत्य ही टोळी काही दिवसांपासून करत होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली त्यांना अटक करण्यात आली आहे. कॉलेजमध्येच त्यांची वरात काढून दहशत माजवणाऱ्यांना धडा शिकवण्याचा पोलिसांचा प्रयत्न आहे.

दरम्यान, सदाशिव पेठ येथे तरूणीवर झालेल्या हल्ल्यानंतर पुणे पोलीस अॅक्शन मोडवर आले असून गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT