पुणे

वाई:-गरवारे टेक्निकल फायबर्सतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात.

CD

गरवारे टेक्निकल फायबर्सतर्फे महिलांचा सन्मान


वाई, ता. १६ : येथील गरवारे टेक्निकल फायबर्स कंपनीच्या वतीने जागतिक महिला दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात कंपनीतील ११०० हून अधिक महिला कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
औद्योगिक वसाहतीतील सुशीला मंगल कार्यालयात झालेल्या कार्यक्रमास कंपनीचे अध्यक्ष विवेक कुलकर्णी होते. रमेश गरवारे इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका अपूर्वा कुलकर्णी, उपाध्यक्ष रवींद्र कुलकर्णी, सरव्यवस्थापक युवराज थोरात यांच्यासह कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.
विवेक कुलकर्णी म्हणाले, ‘‘समाजाच्या प्रगतीचा पाया मजबूत करण्यामध्ये महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. महिला सक्षमीकरण ही प्रगतशील समाजाची खरी ओळख असून, याच सामाजिक बांधिलकीतून गरवारे कंपनीतर्फे सामाजिक, शैक्षणिक, पर्यावरण आणि आरोग्य या क्षेत्रांत विविध उपक्रम राबविले जात आहेत.’’
कार्यक्रमात हळदी-कुंकू, सांस्कृतिक कार्यक्रम तसेच लकी ड्रॉचे आयोजन करण्यात आले होते. लकी ड्रॉद्वारे निवडलेल्या तीन महिलांना तसेच वर्षभरात जास्त दिवस काम केलेल्या महिलांना हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास उपस्थित असलेल्या सर्व महिलांना कंपनीच्या वतीने भेटवस्तू देण्यात आल्या.
युवराज थोरात यांनी प्रास्ताविक केले. कल्याणी दुधाने व धनश्री ढगे यांनी सूत्रसंचालन केले. सचिन कुलकर्णी यांनी आभार मानले. यावेळी कंपनीचे अधिकारी सचिन कुलकर्णी, बलजितसिंग सैनी, चंद्रशेखर बदाने, प्रशांत कुलकर्णी, कामगार संघटनेचे सेक्रेटरी अर्जुन सावंत यांच्यासह अधिकारी आणि महिला कर्मचारी उपस्थित होत्या.
-------
07686
वाई : पारितोषिक वितरणप्रसंगी विवेक कुलकर्णी, अपूर्वा कुलकर्णी, अरविंद कुलकर्णी, युवराज थाेरात, सचिन कुलकर्णी, बलजितसिंग सैनी, चंद्रशेखर बदाने, प्रशांत कुलकर्णी, अर्जुन सावंत व इतर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

Pune Crime: पुण्यात मोठी कारवाई; ‘एमडी’ ड्रग्ज कारखाना उघडण्याचा कट उधळला, सव्वा कोटींच्या मुद्देमालासह आठ जणांना अटक!

संकटाचा काळ! वर्षभर परदेशगमन, सोनं खरेदी करू नका; खाद्यतेलही कमी खा, मोदींनी असं आवाहन का केलं?

Iran-US War: चर्चा म्हणजे शरणागती नाही... अमेरिकेविरोधात इराणचा आक्रमक सूर, दोन्ही देशांमधला संघर्ष अधिक तीव्र?

SCROLL FOR NEXT