Gas-Cylinder 
पुणे

गॅस सिलिंडरची दरवाढ सुरूच

सकाळवृत्तसेवा

पिंपरी - गेल्या काही महिन्यांत घरगुती गॅस सिलिंडरचे दर भडकल्याने सर्वसामान्यांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. आठ महिन्यांत सिलिंडरच्या दरात तब्बल २८९ रुपयांची वाढ झाली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमतीत सातत्याने घसरण होत आहे. त्यातुलनेत देशांतर्गत पेट्रोल- डिझेलसह अन्य पेट्रोलियम पदार्थांचे दर कमी झालेले नाहीत. त्यातच घरगुती गॅस सिलिंडरच्या (एलपीजी) दरातही सातत्याने वाढ होत आहे. घरगुती गॅस सिलिंडरचा दर एप्रिलमध्ये ६४५ रुपये होता. जूनमध्ये तो ६९१, ऑगस्टमध्ये ७८४, तर नोव्हेंबरमध्ये ९३४ रुपयांपर्यंत पोचला. त्यामुळे एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांतच २८९ रुपयांची वाढ झाली आहे.

सिलिंडरच्या वाढत्या दरांमुळे घरखर्च भागविणे दिवसेंदिवस कठीण होत आहे. सिलिंडरसाठी आधी पैसे द्यावे लागतात. त्याचे अनुदान बॅंकेच्या खात्यात नंतर जमा होते. दरातील २८९ रुपयांची वाढ खूपच आहे. या पैशांत आठ ते दहा दिवसांची भाजी खरेदी करता येत होती. 
- दीप्ती साने, गृहिणी, चिंचवड

आंतरराष्ट्रीय बाजारात पेट्रोलियम पदार्थांच्या किमती उतरल्या आहेत. त्या तुलनेत घरगुती गॅस सिलिंडरचे दर कमी न होता उलट वाढत आहेत. सरकार एकीकडे केरोसीनमुक्तीकडे वाटचाल करण्यास सांगत आहे. दुसरीकडे घरगुती सिलिंडरच्या किमती वाढत आहेत. अशा परिस्थितीत सामान्यांना जगणे अवघड झाले आहे. 
- मानव कांबळे, अध्यक्ष, नागरी हक्क सुरक्षा समिती 

ज्या नोकरी करीत नाहीत, अशा महिलांना घरखर्च भागविणे जास्तच अवघड झाले आहे. केंद्र सरकार एकीकडे लाकूडफाट्यामुळे प्रदूषण होऊ नये म्हणून घरगुती सिलिंडरच्या वापराला प्रोत्साहन देत आहे. दुसरीकडे सिलिंडर महाग होत आहे. मोठ्या कुटुंबाला महिन्याला दोन सिलिंडर लागतात. त्यांची जास्तच आर्थिक कोंडी होते. दुसरीकडे केरोसीन मिळणेही दुरापास्त झाले आहे. 
- शुभदा कुलकर्णी, चिंचवड

एकीकडे सिलिंडरधारकांना केरोसीन मिळत नाही. दुसरीकडे सिलिंडरही महाग झाले आहेत. त्यामुळे जगावे कसे, हा प्रश्‍न दिवसेंदिवस जास्तच भेडसावत आहे. वाढत्या महागाईशी तोंडमिळवणी करणे अवघड जात आहे.
- भारती सावंत, निगडी 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Will MS Dhoni Play IPL 2027? महेंद्रसिंग धोनी पुढच्या वर्षी पिवळ्या जर्सीत दिसेल का? ऋतुराज गायकवाडचं उत्तर, नेमकं काय म्हणाला?

IPL 2026 Playoff Scenario : चेन्नईचे आव्हान संपुष्टात! गुजरातची Qualifier 1 साठी दावेदारी; आता एका जागेसाठी चार संघांमध्ये स्पर्धा

Abhijeet Dipke: दिल्लीत पोहोचताच पोलीस तिहार जेलमध्ये टाकतील... ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपकेंना भीती सतावतेय

Congress politics : ‘कॉक्रोच जनता पक्ष’ हा असंतोषाचा इशारा; काँग्रेसला नव्याने उभारी देण्याचे हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

NEET Paper Leak: नीट पेपरफुटी प्रकरणात लातूरचे बालरोगतज्ज्ञ डॉ. मनोज शिरुरे सीबीआय ताब्यात; मुलासाठी प्रश्नपत्रिका खरेदीचा आरोप

SCROLL FOR NEXT