gas line leakage fire sakal
पुणे

Gas Line Leakage : बालेवाडी येथे गॅस वाहिनी फुटल्याने आग

बालेवाडी येथील एस. के. पी. कॅम्पस समोर एमएनजीएलची वाहिनी फुटली. व मोठया प्रमाणात आगीचे लोळ उठू लागले.

शीतल बर्गे

बालेवाडी येथील एस. के. पी. कॅम्पस समोर एमएनजीएलची वाहिनी फुटली. व मोठया प्रमाणात आगीचे लोळ उठू लागले.

बालेवाडी - येथील एस. के. पी. कॅम्पस समोर एमएनजीएलची वाहिनी फुटली. व मोठया प्रमाणात आगीचे लोळ उठू लागले. अग्निशमन दलाच्या जवानांकडून तत्काळ ही आग विजवण्यात आली. कोणतीही जीवित हानी नाही.

बालेवाडी येथे सध्या हिंजवडी शिवाजीनगर मेट्रोचे काम सुरु असुन, याभागातील एस.के.पी. कॅम्पस समोर मेट्रोच्या कामासाठी जेसीबीच्या साह्याने खड्डा खोदत असताना एमएनजीएल गॅस वाहिनीला धक्का लागल्याने गॅस लिकेज होऊन आग लागली. माहिती मिळताच पाषाण अग्निशमन केंद्राच्या जवानांनी वेळीच घटनास्थळी पोहचून आग पूर्णपणे विझवली. घटनास्थळी एमएमजीएल कंपनीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

सदर आगीच्या वर्दीवर पाषाण केंद्राचे अग्निशमन अधिकारी शिवाजी मेमाणे, वाहन चालक युवराज जाधव, फायरमन जवान बाळराज संगम, रोहित पुष्पराज, बाळासाहेब कारंडे, मदतनीस जवान सिद्धार्थ जोगदंड, अनिकेत जोगदंड, रोहिदास चौधरी यांनी काम केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राज्यपाल कर्नाटकात नाहीत, सिद्धरामय्या राजीनामा कुणाकडे देणार? नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी कसा होणार?

Manoj Jarange: प्रसाद लाड यांचे आता डोळे उघडले असतील, मुख्यमंत्री किती द्वेष करतात; मनोज जरांगेंचा टोला

काय सांगता! 'सेल्फी मैंने ले ली आज' फेम ढिंच्याक पूजा अडकली लग्नबंधनात; नेटकरी म्हणाले- कुणाचे इतके वाईट दिवस आले की...

IPL 2027 मध्ये राहुल द्रविड CSK चा मुख्य प्रशिक्षक, स्टीफन फ्लेमिंगची हकालपट्टी? फ्रँचायझीने दिले महत्त्वाचे अपडेट्स...

Sangli Accident News : सांगलीचे नायब तहसीलदार दादासो पुकळेंची डॉक्टर मुलगीचे अपघाती निधन; कोकण पयर्टन बेतलं जिवावर

SCROLL FOR NEXT