मांडवगण फराटा, ता. १ : तांदळी (ता. शिरूर) हद्दीतील कळसकरवाडी येथे घरगुती गॅस वाहतूक करणारा ट्रक उलटला. ही घटना शनिवारी (ता. ३१) रात्री अकराच्या सुमारास घडली. ट्रकमध्ये घरगुती गॅसने भरलेल्या सुमारे २०० टाक्या असल्याने अपघाताचे गांभीर्य वाढले होते. मात्र, गॅसगळती न झाल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघातात ट्रकचालक जखमी झाला असून त्याला ग्रामस्थांनी काष्टी येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.
मिळालेल्या माहितीनुसार, बीड येथील ट्रक (एम. एच. २५ यू १४९६) शनिवारी सकाळी चाकण येथे गॅस सिलिंडर भरण्यासाठी गेला होता. शनिवारी रात्री अकराच्या सुमारास हा ट्रक चाकणवरून पुन्हा बीडकडे जात होता. तांदळी हद्दीतील कळसकरवाडीजवळील धोकादायक वळणावर आल्यानंतर समोरून येणाऱ्या भरधाव लक्झरी बसने कट मारल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. त्यानंतर ट्रक थेट शरद कळसकर यांच्या उसाच्या शेतात जाऊन उलटला. दरम्यान, रविवारी (ता. १) सायंकाळी पाचच्या सुमारास क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त ट्रक पूर्ववत करण्यात आला.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग विभागाने या ठिकाणी दिशादर्शक फलक आणि संरक्षक कठडे तातडीने बसवावेत, अशी मागणी किरण कळसकर आणि रवी कळसकर यांनी केली आहे.
03756
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.