पुणे

गटारीसाठी कायपण! चिकन-मटण खरेदीसाठी पुणेकरांच्या लांबच लांब रांगा

सकाळ वृत्तसेवा

आषाढ अमावस्या, त्यात रविवार...मग काय पुणेकरांनी सकाळपासूनच आखाड साजरा करायला मटण, चिकनची दुकाने गाठली. सकाळी सहा वाजल्यापासूनच मटण आणि चिकनच्या दुकानाबाहेर पुणेकरांनी रांगा लावल्या आहेत. कोरोना स्थिती पाहाता खबरदारीचा उपाय म्हणून शहरात विकेंड लॉकडाउन लागू करण्यात आला असून नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, याकडे दुर्लक्ष करून गटारी अमावस्या असल्याने पुणेकरांनी चिकन, मटण खरेदीसाठी गर्दी केली आहे. दुकानाच्या बाहेर लांबच लांब रांगा लावल्याचं चित्र दिसत आहे.

शहरात विकेंड लॉकडाउन असतानाही पुणेकरांनी चिकन, मटण खरेदीसाठी गर्दी केली होती. मटण 700 ते 750 रुपये किलो, चिकन 200- 220 रुपये किलोने विक्री होत आहे. अनेक ठिकाणी तर नागरिकांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रत्येक दुकानासमोर 50 ते 100 जणांच्या रांगा लागल्या आहेत. त्यामुळे दुकानासमोर गर्दीच गर्दी दिसत होती. पुणे शहरात करोनाचा संसर्ग सध्या कमी होत असतानाच अशा पद्धतीने नागरिकांनी गर्दी करणे म्हणजे प्रशासनाच्या नियोजनाला हरताळ फासण्याचा प्रकार असल्याची चर्चा होऊ लागली आहे.

अनेक ठिकाणी कोरोना नियमांचं उल्लंघन झाल्याचं दिसले. मास्क आणि शारीरिक अंतर पाळत नसल्याचे निदर्शनास आलं. पण काही पुणेकरांनी आणि दुकानदारांनी कोरोना नियमांचं पालन केल्याचेही पाहायला मिळाले. काही भागात शारीरिक अंतर पाळून तर काही ठिकाणी गर्दी करून मात्र मास्क घालून किंवा रुमाल बांधून पुणेकर बाहेर पडले. काही ठिकाणी पुणेकरांना तास-दोन तास रांगेत उभं राहावं लागलं, त्यानंतर मटन -चिकन खरेदी करता आलं. उद्यापासून श्रावण महिन्याला सुरुवात होत आहे. श्रावण महिन्यात मास खाणं वर्ज्य मानलं जाते, त्यामुळे आज मटण खाण्याचा शेवटचा दिवस असल्याने दुकानांवर लांबच लांब रांगा दिसून आल्या.

पुण्यासह, पिंपरी, ठाणे, मुंबई, कोल्हापूर, नागपुरसह इतर महत्वाच्या शहरातही गटारी साजरी करण्यासाठी नागरिकांनी चिकन आणि मटण खरेदीसाठी लांबच लांब रांगा लावल्या आहेत. दरम्यान, आषाढी आमावस्या ही दीप आमावस्या म्हणून साजरी करावी. दीवे अंधार दूर करून प्रकाश देतात. दिव्यांप्रती कृतज्ञता म्हणून ही आमावस्या दीप आमावस्या म्हणून साजरी करावी, असे आवाहन सोशल मीडियावरून होवू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT