Gaurav-vallabh.jpg 
पुणे

गौरव वल्लभ म्हणतायेत, हाच 'न्यू इंडिया' आहे का?

सकाळ वृत्तसेवा

पुणे: आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हाच "न्यू इंडिया' आहे का, असा सवाल करीत काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर रविवारी निशाणा साधला. 

काँग्रेस भवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत वल्लभ बोलत होते. केंद्रातील भाजप सरकारच्या आर्थिक कारभारावर त्यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले, "देशावर आर्थिक संकट आले आहे. बेरोजगारीने उच्चांक गाठला आहे. उत्पादन आणि बांधकाम क्षेत्र डबघाईला आले आहे. शेती उत्पादनातही घट झाली आहे. राष्ट्रीय उत्पन्नात घट झाली आहे. हाच "न्यू इंडिया' मोंदींना अपेक्षित होता का? यावर बोलण्याऐवजी मोदी प्रत्येक वेळी नवीन कारण पुढे करीत आहेत. अमेरिका दौऱ्यातून किती परकी गुंतवणूक आणली, हे का जाहीर करीत नाही. कधी तरी जनतेच्या "मन की बात'देखील त्यांनी करावी.'' महाराष्ट्रातील निवडणुका काँग्रेस गांभीर्याने लढवत असून, देशपातळीवरील नेते प्रचारासाठी येतील, असेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले. या वेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे, मोहन जोशी, अभय छाजेड उपस्थित होते. 

'पीएमसी'वर श्‍वेतपत्रिका काढावी 
पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी बँकेतील गैरव्यवहार प्रकरणावर अर्थमंत्र्यांनी बोलायला हवे. बँकेच्या सर्व संचालकांवर गुन्हा दाखल करावा. तसेच, याप्रकरणी श्‍वेतपत्रिका काढावी, अशी काँग्रेसची मागणी असल्याचे गौरव वल्लभ यांनी सांगितले. मुलुंड येथील भाजपच्या एका आमदाराचे पुत्र या बँकेवर संचालक आहेत. शंभर कोटी रुपयांचा नफा असलेली आणि 23 सप्टेंबरपर्यंत सुस्थितीत असलेली बँक अचानक अडचणीत कशी येते, असा प्रश्‍नही त्यांनी केला. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुलगा दत्तक घेणाऱ्या महिलांना मातृत्व रजेपासून वंचित ठेवणं असंवैधानिक, सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय...

Jalgaon News : झाडांची कत्तल अन् तलावाची हानी! मेहरूण तलाव वाचवण्यासाठी पर्यावरणप्रेमी सरसावले

Dombivli: क्रिकेट खेळताना चिमुकल्यावर काळ ओढवला; हसत्याखेळत्या कुटुंबाची स्वप्न क्षणात उद्ध्वस्त, मुंबईत नेमकं काय घडलं?

Stock Market Today: शेअर बाजार तेजीत! हे शेअर्स चमकले; मात्र मोठ्या IPO ला ब्रेक का?

मोठी बातमी! ठाणे-मुलुंडदरम्यान नवे रेल्वे स्थानक उभारण्यास मंजुरी; स्टेशनला आनंद दिघेंचे नाव देण्याची खासदारांची मागणी

SCROLL FOR NEXT