पुणे

गौरी पूजन असे करा

CD

आज सोन्याच्या पावलांनी येणार गौरी
सायं. ७.५४ पर्यंत आवाहन; १८ रोजी पूजन, १९ रोजी विसर्जन

सोलापूर, ता. १६ : माहेरवाशिणी गौरीच्या स्वागताची लगबग घरोघरी असून, उद्या (ता. १७) सोन्याच्या पावलांनी गौरीचे आगमन होणार आहे. अनुराधा नक्षत्रावर सायंकाळी ७.५४ पर्यंत गौरीचे आवाहन करावे. शुक्रवारी (ता. १८) ज्येष्ठा नक्षत्रावर गौरी पूजन, तर शनिवारी (ता. १९) मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन करावे.

गौरीचे आवाहन करताना घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर गौरीचे ‘गौराई आली, सोन्याच्या पावलांनी’ असे म्हणत गौरीला घरात आणावे. पाटावर धान्य पसरून त्यावर गौरीची स्थापना करावी. त्यावर कलश ठेवून पूजा अन् नैवेद्य दाखवावा.
शुक्रवारी (ता. १८) गौरी पूजन
दुसऱ्या दिवशी गौरीला नवीन वस्त्र अन् दागिने घालून सजवावे. षोडशोपचार पूजा करून १६ प्रकारची पाने अन् फुले ‘ॐ महालक्ष्म्यै नमः’ या मंत्राचा जप करत अर्पण करावीत. सुवासिनी महिलांनी गौरीची ओटी भरावी. दुपारी पुरणपोळी, १६ प्रकारच्या भाज्या, पंचपक्वान्न अन् फराळाचा महानेवैद्य दाखवावा. सायंकाळी हळदी-कुंकवाचा कार्यक्रम घ्यावा.

शनिवारी (ता. १९) गौरी विसर्जन
तिसऱ्या दिवशी सकाळी गौरीची पूजा करून दहीभात किंवा रवा शिऱ्याचा नैवेद्य दाखवावा. त्यानंतर उत्तरपूजा करून गौरीचे मुखवटे हलवावेत. गौरीला सन्मानपूर्वक निरोप द्यावा.

पूजेसाठी साहित्य
गौरीचे मुखवटे, मूर्ती किंवा नदीतील खडे, हळद, कुंकू, अक्षता, अष्टगंध, गुलाल, तांदूळ, तांब्याचे भांडे, पळी, ताम्हण, फुलांचे भांडे, कलश, सुवासिक फुले, दुर्वा, तुळशीची पाने, आघाडा, बेलपत्र अन् १६ प्रकारची पाने पूजेसाठी तयार ठेवावीत.

कोट PNE26W50415
ज्येष्ठा गौरी म्हणजे माहेरी आलेली माहेरवाशीण. प्रांतानुसार तिचे आवाहन करण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत. गौरीच्या दिवशी भाजी-भाकरी, ज्वारीची कणगी असा नैवेद्य दाखवून हळदी-कुंकू, झिम्मा-फुगडी आदींची परंपरा जपावी. अष्टमीला श्रीमहालक्ष्मी पूजन करून पुरणाचा नैवेद्य दाखवावा. मूळ नक्षत्रावर विसर्जन करून दहीभाताचा नैवेद्य दाखवत अक्षता वाहून निरोप द्यावा.
- वेणुगोपाल जिल्ला, पंतुलु

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Live Updates : कळंबा कारागृहात दंगा- आरडाओरड करण्यास मनाई केल्याने अधिकाऱ्याला मारहाण

Manoj Jarange Patil: मोठी बातमी! हैदराबाद गॅझेटियरमध्ये नावंसुद्धा सापडली; विखे पाटलांसह शिष्टमंडळ हैदराबादला जाणार?

Vidyadhar Anaskar : राज्य सहकारी बँकेचे ५,७४५ कोटींचे विक्रमी नेटवर्थ; ठेवी कमी करण्याचा निर्णय व्यावसायिक गणितातून

पाकिस्तानचं नवीन नाटक! PCB नंतर आता हॉकी संघाने भारतात येण्यास दिला नकार; म्हणतात, आमच्या खेळाडूंना सुरक्षित वातावरण हवंय...

CM Devendra Fadnavis : मनोज जरांगे पाटील यांच्या १३ पैकी १२ मागण्या मान्य! आंदोलन करून गणेशोत्सवावर ताण आणू नका; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT