Gavran Hapus Mango sakal
पुणे

Gavran Hapus Mango : गावरान हापूसला पाच वर्षांतील मिळताहेत उच्चांकी भाव

चवीला गोड, आकाराने मोठा, गर आणि रस जास्त असलेल्या गावरान हापूसला बाजारात मागणी वाढली आहे.

सकाळ वृत्तसेवा

मार्केट यार्ड - चवीला गोड, आकाराने मोठा, गर आणि रस जास्त असलेल्या गावरान हापूसला बाजारात मागणी वाढली आहे. रत्नागिरी हापूसचा हंगाम संपला असून, कर्नाटक येथून तुरळक आवक होत आहे. त्यामुळे बाजारात गावरान हापूसला बाजारात मागणी वाढली आहे. परिणामी, मंगळवारी (ता. ११) झालेल्या लिलावात किलोला २०१ रुपये हा पाच वर्षांतील उच्चांकी भाव मिळाला आहे.

हवेली तालुक्यातील मांडवी येथील शेतकरी शंकर पायगुडे आणि रोहिदास गोगावले यांच्या आंब्याला सर्वाधिक २०१ रुपये प्रतिकिलो भाव मिळाल्याचे आंब्याचे व्यापारी युवराज काची यांनी सांगितले.

साधारणतः जूनच्या पहिल्या आठवड्यात गावरान हापूस, पायरी आणि केशर आंबा बाजारात दाखल होण्यास सुरुवात होते. केशर दिसायला पिवळा आणि आकाराने थोडासा लांबट आणि टोकदार असतो. हा आंबा चवीलाही गोड असतो. जून ते जुलैपर्यंत या आंब्यांचा हंगाम असतो. पाऊस पडायला सुरुवात झाली की गावरान हापूस, पायरी आणि केशर आंब्याला ग्राहकांकडून मागणी वाढते.

इतर आंब्यांचे भाव

  • केशर - ८० ते १२५ रुपये

  • पायरी - ३० ते ६०

  • राजापुरी - ३० ते ४५

बाजारात घरगुती ग्राहकांकडून मागणी जास्त आहे. तसेच पल्प बनविणारे, शहरातील स्टॉल धारक, किरकोळ विक्रेते आणि ज्यूस विक्रेत्यांकडूनही मोठ्या प्रमाणावर आंबा खरेदी करण्यात येत आहे. यंदा दर्जा चांगला असल्याने भाव जास्त असून, मागणीही चांगली आहे.

- युवराज काची, आंब्याचे व्यापारी, मार्केट यार्ड.

येथून येतो आंबा

पुणे जिल्ह्यातील मुळशी, मावळ, भोर, इंदापूर, बारामती परिसर तसेच राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर गावरान आंबा बाजारात येतो.

८५ ते ९० टन गावरान आंब्याची मंगळवारी झालेली आवक

९० ते १२० रुपये घाऊक बाजारात गावरान हापूसला मिळालेला भाव

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Injury Updates: मुंबई इंडियन्ससह ८ संघांना बसलाय दुखापतीचा फटका; आतापर्यंत १४ खेळाडूंनी वाढवली फ्रँचायझींची डोकेदुखी

मिरा-भाईंदरमध्ये नवे वाहनतळ उभारणार, वाहतूक कोंडी कायमची फुटणार; पालिकेचा मोठा निर्णय

जीजी झाली मॉडर्न! 'येड लागलं प्रेमाचं' मधून एक्झिट घेताच नव्या मालिकेत दिसणार नीना कुळकर्णी; नेटकरी चकीत

Latest Marathi News Live Update : पिंपरी-चिंचवड शहरातील डी. वाय. पाटील रुग्णालयातून ५.२२ लाखांची इंजेक्शने लंपास

Sugar industry: राज्यातील साखर उद्योग सापडला आर्थिक कोंडीत; अनुदानाची टांगती तलवार, ३०० कोटींचा ‘ट्रेझरी’ प्लॅन!

SCROLL FOR NEXT