gawadewadi widow woman sakal
पुणे

Widow Woman : पतीच्या निधनानंतर विधवा महिलांच्या बांगड्या न फोडण्याचा ठराव

आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे विधवा प्रथा संपुष्टात आणण्यासाठी २५ विधवा महिलांची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली. त्यांना हळदी-कुंकूवाचा सन्मान देण्यात आला.

डी .के. वळसे-पाटील

आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे विधवा प्रथा संपुष्टात आणण्यासाठी २५ विधवा महिलांची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली. त्यांना हळदी-कुंकूवाचा सन्मान देण्यात आला.

मंचर - आदर्शगाव गावडेवाडी (ता. आंबेगाव) येथे विधवा प्रथा संपुष्टात आणण्यासाठी २५ विधवा महिलांची खणा-नारळाने ओटी भरण्यात आली. त्यांना हळदी-कुंकूवाचा सन्मान देण्यात आला. अनेक वर्षानंतर कपाळावर हळद-कुंकू लाऊन मिळालेल्या सन्मानाने महिलांचा आनंद द्विगुणीत झाला. यापुढे संबंधित महिलांच्या हस्तेच अनेक शुभ कार्य करण्याचा, त्यांना सक्षम महिला म्हणण्याचा व पतीच्या निधनानंतर बांगड्या न फोडण्याचा ठराव महिलांच्या ग्रामसभेत मंजूर करण्यात आला. या निर्णयाची प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाईल अशी घोषणा सरपंच स्वरूपा ऋषिकेश गावडे यांनी केली. त्यांच्या या निर्णयाचे उपस्थितांनी उत्स्पुर्तपणे टाळ्या वाजवून स्वागत केले.

'प्रजासत्ताक दिनानिमित्त गुरुवारी (ता. २६) स्वरूपा गावडे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा झाली. यावेळी ग्रामसेविका दिपाली थोरात, उपसरपंच योगिता गावडे, मुख्याध्यापिका शशिकला चिखले, सदस्या मंदा गावडे, प्रियांका गावडे, मंगल गावडे, स्नेहल गावडे, ज्योती गायकवाड, मीना सोपानराव निघोट उपस्थित होत्या.

हळदी कुंकवाचा कार्यक्रम हा प्रत्येक महिला वर्गाचा आवडता कार्यक्रम आहे. यासाठी महिला नटून थटून आवर्जून आल्या होत्या. मीना निघोट यांच्यासह अनेक महिलांच्या डोळ्यातून आलेले आनंदाश्रू पाहून अन्य महिलाही भारावून गेल्या.

यासंदर्भात सरपंच स्वरूपा गावडे म्हणाल्या, 'महाराष्ट्र शासनाने विधवा प्रथा बंद करण्याचा निर्णय जाहीर केला असून यापुढे विधवा महिलांना प्रत्येक गावात सन्मानपूर्वक वागणूक द्या. असे आदेश काढले आहेत. यापुढे विधवा शब्द न वापरता सक्षम महिला असा शब्द वापरला जाईल. सनातन विचारांना फाटा दिला जाईल. यापुढे पतीचे निधन झाल्यास बांगड्याही फोडल्या जाणार नाहीत.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abhijeet Dipke: जंतर-मंतर आंदोलनानंतर आता शाळांवर अभिजीत दिपकेंचा फोकस! शाळा सुधारा अभियान राबवणार; 'या' जिल्ह्यातून शुभारंभ होणार

Swapnil Lande Bhondubaba News: पुण्यात संतापजनक प्रकार! १०वीत चांगले मार्क मिळवून देण्याच्या नावाखाली भोंदू बाबाकडून अल्पवयीन मुलीचं लैंगिक शोषण

‘तुम्ही बीवी पगलू आहात?’ KBC 18 मध्ये अमिताभ बच्चन यांना थेट सवाल; म्हणाले, ‘मी जयाचा...’

Marathi News Live Updates :  दोन-चार दिवसांत 5 ते 10 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होतील, कृषीमंत्र्यांची घोषणा 

Genelia Emotional Post: पप्पा, मुलांची आणि तुमची भेट व्हायला हवी होती... सासरे विलासराव देशमुख यांच्यासाठी जिनिलियाची खास पोस्ट; म्हणाली- तुम्ही...

SCROLL FOR NEXT