‘गीत रामायण sakal
पुणे

‘गीत रामायण’ रसिकांच्या भेटीला

बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी पहाटे साडेपाच वाजता होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे: मराठी मनाचा ठाव घेणारा, मनाला फुलविणारा ‘गीत रामायण’ हा कार्यक्रम गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर शनिवारी (ता. २) पुणेकर रसिकांच्या भेटीला येत आहे. ‘सकाळ’ आयोजित हा कार्यक्रम ‘गुढीपाडवा पहाट’ म्हणून नवीन ऊर्जा, नवं चैतन्य घेऊन येत असून हा कार्यक्रम बालगंधर्व रंगमंदिरात शनिवारी पहाटे साडेपाच वाजता होणार आहे.

गदिमा व्यासपीठाच्या वतीने सादर होणार हा कार्यक्रम लोकमान्य मल्टीपर्पज को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड प्रस्तुत असून त्यासाठी कोहिनूर ग्रुप सहप्रायोजक आहेत. या कार्यक्रमात ज्येष्ठ गायक आणि गदिमा व्यासपीठाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद माडगुळकर निरूपण करणार आहे.हा कार्यक्रम सर्वांसाठी विनामूल्य असून त्यासाठी प्रवेशिका दिल्या आहेत. या कार्यक्रमाची रसिकांमध्ये उत्सुकता असल्याने प्रवेशिका अवघ्या काही तासात संपल्या आहेत. कोणत्याही प्रकारे अधिक प्रवेशिका उपलब्ध होणार नाहीत. मर्यादित जागा असल्याने प्रवेशिका घेऊन येणाऱ्या श्रोत्यांना ‘प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य’ पद्धतीने प्रवेश दिला जाईल.

‘सकाळ मनी’ मासिकाचे प्रकाशन

गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर ‘सकाळ माध्यम समूहा’च्या वतीने अर्थ-उद्योग-गुंतवणूक क्षेत्रातील बदलांचा सातत्याने वेध घेणाऱ्या ‘सकाळ मनी’ मासिकाचे प्रकाशन शनिवारी (ता. २) ‘गीत रामायण’ कार्यक्रमादरम्यान होणार आहे. या मासिकाचे प्रकाशन आणि पहिला अंक मराठी नववर्षाच्या पहिल्याच दिवशी वाचकांसमोर येणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gujarat Rain Update: गुजरातमध्ये पावसाचा हाहाकार, २४ तासांत तब्बल १०६४ मिमीची नोंद; तिसऱ्या क्रमांकाचा विक्रम

Maharashtra Farm Loan Waiver : पुणे जिल्ह्यातील 61,900 शेतकऱ्यांना 533 कोटींची कर्जमाफी; दुसरी यादी जाहीर, तुमचं नाव आहे का?

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर आंदोलनाचं काय होणार? CJP चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी स्पष्टच सांगितलं

Pune Rain Update: पुणे घाटमाथ्यावर रेड अलर्ट; खडकवासला धरण १०० टक्के भरले, चारही धरणांत किती टक्के पाणीसाठा?

Trump Tariffs : डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतासह ६० देशांना झटका, नवीन टॅरिफ जाहीर; व्यापारावर होणार परिणाम

SCROLL FOR NEXT