Geeta Malusare sakal
पुणे

Gita Malusare : ‘जेली फिश’ने घेतला चावा; गीता मालुसरेची हात वाचविण्यासाठी झुंज

अथांग अरबी समुद्राच्या एकेका लाटेवर स्वार होत ‘ती’ विजयदुर्गच्या भागात पोहत होती. पोहण्याचा तिचा वेग बघणाऱ्याला अक्षरशः थक्क करणारा होता.

सकाळ वृत्तसेवा

अथांग अरबी समुद्राच्या एकेका लाटेवर स्वार होत ‘ती’ विजयदुर्गच्या भागात पोहत होती. पोहण्याचा तिचा वेग बघणाऱ्याला अक्षरशः थक्क करणारा होता.

पुणे - अथांग अरबी समुद्राच्या एकेका लाटेवर स्वार होत ‘ती’ विजयदुर्गच्या भागात पोहत होती. पोहण्याचा तिचा वेग बघणाऱ्याला अक्षरशः थक्क करणारा होता. समुद्राच्या जड पाण्याला मागे सरकविण्यासाठी तिचे हात झपाझप पाण्यावर पडत होते. इतक्यात एक ‘जेली फिश’ तिच्या हाताला चावला. ती स्पर्धा तिने यशस्वी केली. पण, त्यानंतर त्या माशाच्या चाव्याची दाहकता लक्षात येऊ लागली आणि ‘त्या’ राष्ट्रीय जलतरणपटूची हात वाचविण्यासाठी झुंज सुरू झाली.

गीता महेश मालुसरे असे या जलतरण पटूचे नाव. जलतरण तलावामध्ये सराव करून वयाच्या अवघ्या पंधराव्या वर्षी वाशी ते ‘गेट वे ऑफ इंडिया’पर्यंतचा ३१ किलोमीटरचे अंतर पोहत सहज पार केले. तेव्हापासून अरबी समुद्राच्या लाटांशी जणू तिची जणू जिवलग मैत्रीच झाली. पण, या वेळी समुद्रच ज्याचा अधिवास आहे, असा एक जेली फिश समुद्रात पोहत असलेल्या गीताच्या उजव्या हाताला चावला. त्यावेळी तिला काही फारसे जाणवले नाही. मात्र, सुमारे दोनशे मीटरचे अंतर शिल्लक असताना पुन्हा तिला जेली फिशी चावला. त्यामुळे तिला प्रचंड त्रास जाणवू लागला. मात्र, तरीही तिने स्पर्धा पूर्ण केली. या स्पर्धेत तिने दुसरा क्रमांक पटकावला. पण, त्यानंतर हात फार दुखू लागला.

हाताच्या पंजाचा भाग गार पडला. नंतर तो काळा झाला. या सगळ्या घटना जेली फिश चावल्यानंतर दोन-तीन दिवसांमध्ये सुरू झाल्या. काय झालं, कसं झालं, कधी झालं या कोणत्याच प्रश्नाचं उत्तर शोधण्यापेक्षा पोहण्याच्या करिअरमध्ये आवश्यक असलेला हात वाचविण्याची धडपड सुरू झाली. गिता उपचारासाठी पूना हॉस्पिटलमध्ये दाखल झाली. तेथे सर्जन डॉ. अमोल पाठक यांनी तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली.

पुढे काय होणार?

गीताला समुद्रात पुन्हा त्याच क्षमतेने पोहता यावे, यादृष्टीने प्रयत्न आहेत. तिच्यावरच्या सर्व शस्त्रक्रिया पूर्ण झाल्या आहेत. पुढील तीन ते चार महिने तिला फिजिओथेरपी करावी लागेल. त्यानंतर ती पूर्ववत हाताची हालचाल करू शकेल, असा विश्वास डॉ. अभिषेक घोष यांनी व्यक्त केला.

काय झाले?

  • जेली फिश चावल्यानंतर पहिले दोन-तीन दिवस फारसे काही जाणवले नाही. मात्र, त्यानंतर चावलेल्या भागातील रक्तवाहिन्या सुरुवातीला आकुंचन पावल्या. त्यानंतर त्यातून रक्तप्रवाह पूर्णतः थांबला. त्यामुळे उजव्या हाताचा पंजा, बोटे यांना होणारा रक्तपुरवठा खंडित झाला.

  • माशाच्या विषामुळे चावलेल्या भागातील पेशी कडक होतात. त्याचा दाब रक्तवाहिन्यांवर पडतो. त्यातून रक्त प्रवाह बंद झाला.

  • तळहात गार पडू लागला. तो काळा झाला.

काय केले?

  • रुग्णालयात आल्यानंतर सर्वप्रथम सीटी अँजिओ करण्यात आला. त्यात तळहाताला, बोटांना रक्तप्रवाह होत नसल्याचे दिसले. तातडीने शस्त्रक्रिया करून दाबल्या गेलेल्या रक्तवाहिन्यांना मोकळे करण्यात आले.

  • स्नायू कमकुवत झाले होते. उपचारांना अजून काही वेळ उशीर झाला असता तर त्याची कार्यक्षमता कमी होण्याचा धोका होता.

  • शस्त्रक्रिया करून रक्तवाहिन्या मोकळ्या केल्याने आता हाताच्या बोटांची हालचाल होऊ लागली.

जेली फिश चावल्यानंतर बहुतांश जलतरण पटूंमध्ये गुंतागुंत होत नाही. गीतामध्ये ती दुर्मीळ गुंतागुंत झाली. दहा लाखांमध्ये एखाद्या जलतरणपटूमध्ये अशी घटना घडते. तसेच, रुग्णाच्या रक्तवाहिन्या पुन्हा व्यवस्थित यशस्वीपणे जुळविण्याच्या घटना त्याहून कमी आहेत.

- डॉ. अभिषेक घोष, मायक्रोव्हॅस्क्युलर अँड कॉस्मेटिक सर्जन, पूना हॉस्पिटल

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray : मराठी माणसाच्या आनंदाला 'रुदाली' म्हणणं ही हिणकस अन् विकृत प्रवृत्ती; उद्धव ठाकरेंनी फडणवीसांना सुनावलं...

Latest Maharashtra News Updates : पुण्यात शिवसेना महानगर प्रमुखाचे पोस्टर फाडले

Guru Purnima: या गुहेत ऋषी वेदव्यासांचं वास्तव्य? पुराणकथांना मिळतोय पुरावा!

Video : अजगर आहे की खेळणं? 15 फुटाच्या अजगरासोबत गावकऱ्यांनी बनवल्या रील्स, थरारक व्हिडिओ व्हायरल..

Maharashtra Rain: पालघरला पावसाने झोडपले! नदीला पूर, धरणाचे 5 दरवाजे उघडले, हवामान विभागाचा सतर्कतेचा इशारा

SCROLL FOR NEXT