पुणे

पारनेर - महिला सक्षमीकरण कार्यशाळा

CD

SPU26B06541
पारनेर ः महिला सक्षमीकरण कक्षातर्फे आयोजित ‘लैंगिक समानता आणि संवेदना या कार्यशाळेत बोलताना डॉ. ऋत्विज म्हस्के खिलारी.

समानता केवळ कागदावर नको
ऋत्विज म्हस्के ः ''लैंगिक समानता आणि संवेदनशीलता'' कार्यशाळा
पारनेर, ता. ५ ः स्त्री-पुरुष समानता ही केवळ कायद्याच्या चौकटीत किंवा कागदावरील घोषणांपुरती मर्यादित न राहता प्रत्येकाच्या दैनंदिन वर्तनातून आणि दृष्टिकोनातून प्रतिबिंबित होणे गरजेचे आहे. परस्परांच्या भावना, हक्क आणि स्वाभिमानाचा आदर करणारी मानसिकता समाजात निर्माण झाली, तरच सुरक्षित, सन्मानपूर्ण आणि समताधिष्ठित समाजाची निर्मिती शक्य होईल, असे प्रतिपादन डॉ. ऋत्विज म्हस्के खिलारी यांनी केले.

येथील न्यू आर्टस्, कॉमर्स ॲण्ड सायन्स महाविद्यालयात महिला सक्षमीकरण कक्षाच्या वतीने ‘लैंगिक समानता आणि संवेदना’ या विषयावर विशेष कार्यशाळेत त्या बोलत होत्या. महिला सक्षमीकरण कक्षाच्या सदस्या प्रा. ज्योत्स्ना म्हस्के यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
डॉ. म्हस्के खिलारी म्हणाले, समाजाचा समतोल हा स्त्री-पुरुष समानतेवर अवलंबून आहे. समता ही समृद्ध आणि प्रगत समाजाचा भक्कम पाया असल्याचे त्यांनी सांगितले. समानतेकडे केवळ ‘हक्क’ किंवा ‘अधिकार’ म्हणून न पाहता ती आपल्या विचारसरणीचा आणि सामाजिक वर्तनाचा अविभाज्य भाग बनली पाहिजे. समाजात वावरताना समोरच्या व्यक्तीच्या हक्कांसोबतच तिच्या भावना आणि स्वाभिमानाची जाणीव ठेवणे ही आजच्या काळाची मोठी गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्राचार्य डॉ. रंगनाथ आहेर म्हणाले, स्त्री-पुरुष समानतेचे महत्त्व स्पष्ट करताना समाजरूपी रथाच्या दोन चाकांचे उदाहरण दिले. स्त्री आणि पुरुष ही समाजरथाची दोन महत्त्वाची चाके असून, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी या दोन्ही चाकांची प्रगती समान वेगाने होणे आवश्यक आहे.
या कार्यशाळेस महाविद्यालयाचे समन्वयक डॉ. दत्तात्रय घुंगार्डे, विद्यार्थी विकास अधिकारी डॉ. हरेश शेळके, डॉ. दीपक सोनटक्के, डॉ. पुष्पा घोगरे आदी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. प्रांजली भराटे यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. आरती गाडिलकर आणि प्रा. आरती खामकर यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Satana News : दुष्काळ जाहीर; मात्र शेतकरी डिजिटल चक्रव्यूहात, सातबारा अन् ‘फार्मर आयडी’साठी संकेतस्थळे ठप्प

SME Growth Fund : लघु आणि मध्यम उद्योगांसाठी १० हजार कोटींचा 'एसएमई ग्रोथ फंड'; केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

Marathi News Live Updates: पुनर्विकासाचे सर्वाधिक प्रकल्प कोथरूडमध्ये ‘द रीडेव्हलपमेंट पल्स’चा अहवाल

Sanchar Saathi Milestone : सायबर फसवणुकीविरोधात नागरिक बनले ‘योद्धा’! ‘संचार साथी’ पोर्टलने ओलांडला ३० कोटी भेटींचा टप्पा

Mumbai Police: 2 हजार 850 बनावट अ‍ॅप्स अन् 9 हजार 673 नागरिकांची 150 कोटींची फसवणूक; मुंबई पोलिसांनी केला पर्दाफाश

SCROLL FOR NEXT