पुणे

जैन मुनि प्रवचन

CD

चूक दाखवताना शब्दांचा गोडवा जपा
एखाद्याची चूक दाखवताना शब्द कटू असण्यापेक्षा त्यात गोडवा असणे महत्त्वाचे आहे. आपले बोलणे समोरच्याला सहज स्वीकारता यावे, त्याचे मन दुखावले जाऊ नये आणि आपल्याला पाहून लोकांनी रस्ता बदलू नये, यासाठी बोलण्याचे भान जपले पाहिजे, असे प्रतिपादन परमपूज्य अक्षयश्रीजी महाराज यांनी केले. कोणाशी, कधी, कुठे, किती आणि कसे बोलावे, हे समजून घेतले पाहिजे. समोरची व्यक्ती समजून घेण्याच्या मनःस्थितीत नसेल, तर तिला वारंवार उपदेश करून वेळ वाया घालवू नका. आपले बोलणे अमृतासमान असावे. त्याचा गोडवा केवळ ओठांवर नव्हे, तर हृदयातही असावा. कोणाचीही चूक गोड शब्दांत समजावून सांगा. आपले बोलणे लोकांना ऐकावेसे वाटेल, अशा पद्धतीने व्यक्त व्हा, असे आवाहन त्यांनी केले.
------------------------------
सत्साहित्याच्या वाचनातून मनाची शुद्धता होते
घर, दुकान आणि शरीराची स्वच्छता राखण्यासाठी माणूस प्रयत्न करतो; मात्र क्रोध, ईर्ष्या, द्वेष आणि मोह या विकारांनी मळलेले मन स्वच्छ करण्याकडे दुर्लक्ष करतो. बाह्य रूपापेक्षा अंतर्मनातील विचार बदलणे महत्त्वाचे आहे. सत्साहित्याचे वाचन, चिंतन आणि मनन यातूनच मनाची मलिनता दूर होऊन शुभ विचारांची जोपासना होते, असे प्रतिपादन मुनिश्री प्रशांतरत्न विजय यांनी केले. आध्यात्मिक साहित्याच्या वाचनाने अशुभ विचार आणि विनाशकारी भावना कमी होऊन मन पवित्र बनते. त्यामुळे सत्साहित्याला मित्र बनवून मन शुद्ध करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान, श्री आदिश्वर जैन श्वेतांबर मूर्तिपूजक संघातर्फे ६ नोव्हेंबरपासून मुलांसाठी विशेष उपधान-अठ्ठाइयां तपाचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी ट्रस्ट मंडळ, लाभार्थी परिवार आणि श्री संघाच्या सदस्यांकडून तयारी सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मालक अचानक घरी आला, १९ वर्षीय लेकीला कर्मचाऱ्यासोबत आक्षेपार्ह स्थितीत पाहिलं, पुढे जे घडलं ते...; थरकाप उडवणारी घटना

IND vs NZ 2nd ODI : भारत-न्यूझीलंड यांच्यातला दुसरा सामना केव्हा? किती वाजता सुरू होणार अन् Live कुठे पाहता येणार

Mahua Moitra: 'सीजेपीला विदेशातून नव्हे, तर भाजपकडूनच फंडींग!' भाजपच्या आरोपांवर महुआ मोइत्रांचा 'गुगली'?

Latest Marathi News Live Update : "स्वीकृत संचालकांना मतदानाचा अधिकार दिल्यास तो कायदा आणि संविधानाच्या चौकटीत टिकणार नाही"; माजी सरन्यायाधीश बी. आर. गवई यांचा स्पष्ट कायदेशीर सल्ला

Someshwar Sugar Factory: सोमेश्वर कारखान्याला नवे नेतृत्व! राजवर्धन शिंदे तिसऱ्यांदा अध्यक्षपदी; संग्राम सोरटे उपाध्यक्ष

SCROLL FOR NEXT