दिल्लीच्या कंपनीला जर्मन हॅंगर उभारण्याचा मक्ता
पंढरपूरच्या सर्वसाधारण सभेत भाविकांसाठीच्या सर्व कामांना मंजुरी
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. २५ : पालखीमार्गावरील विकासकामांना तसेच सोयी-सुविधांना पंढरपूरच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली. पुणे, सोलापूर व सातारा या तीनही जिल्ह्यांत जर्मन हॅंगर उभारण्याचा मक्ता दिल्ली येथील कंपनीस मंजूर करण्यात आला आहे. सर्वात कमी दर दिल्लीच्या कंपनीचा ७ कोटी ९९ लाख रुपये असल्याने तो मक्ता मंजूर केल्याचे सांगण्यात आले. ३७ ठिकाणी वॉटरप्रूफ मंडप उभारण्यासाठी ३.५० कोटींची निविदा ३ कोटी ४९ लाख रुपयांना मंजूर करण्यात आली. यासाठी सात जणांनी निविदा भरली होती. ७२ लाख रुपये तरतूद असलेली चरणसेवा व ४.४३ कोटी रुपये तरतूद असलेली स्वागत कमानी उभारण्यासाठीची निविदा मंजूर करण्यात आली आहे. स्नानगृहासाठीच्या निविदा प्रक्रियेत तिन्ही मक्तेदार अपात्र ठरल्याने पुन्हा एकदा निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
ग्रामपंचायत विभागांतर्गत वारकरी स्वागत कमान व वारकऱ्यांच्या पायांना आराम मिळावा यासाठी फुट मसाजरच्या कामांना मंजुरी देण्यात आली. मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र (जर्मन हॅंगर), वारकऱ्यांसाठी शौचालय सुविधा व पालखीमार्गावरील स्वच्छता, स्नानगृह, पालखी तळांना जोडणारे रस्ते, पिण्याच्या पाण्याचे टँकर, औषधे खरेदी, मोबाईल चार्जिंग स्टेशन या कामांनाही एकमताने मंजुरी देण्यात आली. आषाढी वारीसाठी पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यांसाठी १० कोटी रुपयांच्या औषधे व इतर उपकरणे खरेदीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. पुणे जिल्ह्यासाठी १.९१ कोटी, सातारा जिल्ह्यासाठी १.३३ कोटी तर सोलापूर जिल्ह्यासाठी ६.७४ कोटी रुपयांच्या औषधे व इतर आवश्यक उपकरणांच्या खरेदीस सभेत मंजुरी देण्यात आली.
चौकट...
ग्रामपंचायतींना वाढीव १ कोटीचे अनुदान
पालखीमार्गावरील सांगोला, माढा, बार्शी, मंगळवेढा, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यांतून येणाऱ्या मार्गावरील ग्रामपंचायतींना वाढीव अनुदानाची मागणी करण्यात आली होती. यापूर्वी ८१ ग्रामपंचायतींना ३.५० कोटींचे अनुदान देण्यात येत होते. त्यात आता १ कोटी रुपयांची वाढ करून नवीन १० गावांचा समावेश करण्यात आल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांनी दिली. टँकरसाठीची निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून यासाठी २ कोटी २८ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. १६२ खासगी तर ५८ शासकीय टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.