Commissionerate-of-skill-development 
पुणे

नोकरी मिळत नाही, तर मग कौशल्य विकासाबरोबरच मिळवा रोजगारही

सकाळवृत्तसेवा

पुणे - दहावी, बारावी आणि पदवीचे शिक्षण घेतले परंतु नोकरी मिळत नाही. त्यामागचे मुख्य कारण म्हणजे कौशल्य प्रशिक्षणाचा अभाव. बहुतांश तरुण-तरुणींना येणारी ही अडचण दूर करण्यासाठी विविध कौशल्य विकास योजनांच्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या प्रशिक्षणानंतर तरुण-तरुणींना प्रमाणपत्रासोबत लगेचच रोजगारही उपलब्ध होणार आहे. याव्यतिरिक्त ऑनलाइन रोजगार मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

हे असतील कोर्सेस 
टेलर, एम्ब्रॉयडरी, शिवणकला मशिन ऑपरेटर, हेअर स्टाईलिस्ट, मोबाईल फोन हार्डवेअर टेक्निशियन, टेक्निशियन कॉम्प्युटिंग, नेटवर्किंग ॲंड स्टोअरेज टेक्निशियन, सीसीटीव्ही इन्स्टॉलेशन टेक्निशियन, स्नॅक मेकर, बेकर, डोमेस्टिक आयटी हेल्पडेस्क असिस्टंट, ज्युनिअर सॉफ्टवेअर इंजिनिअर, डेटा एंट्री ऑपरेटर, डॉक्युमेंटेशन असिस्टंट, रिटेल ट्रेनी असोसिएट, असिस्टंट हेअर स्टाइल, एलईडी लाइट टेक्निशियन, सोलर पीव्ही इन्स्टॉल, सांडपाणी प्रक्रिया टेक्निशियन, मशिन ऑपरेटर, लॅब टेक्निशियन, ऑफिस असोसिएट, हाउसकीपिंग अटेंडंट, ट्रॅव्हल कन्सल्टंट, प्लंबर, वर्कशॉप मॅनेजर, टेक्निशियन फूड प्रोसेसिंग.

वेबपोर्टलवर रोजगार मेळावा
कोरोनाच्या संकटानंतर कौशल्य विकास,  रोजगार व उद्योजकता विभागाच्या वतीने रोजगार मेळावा होणार आहे. केवळ ऑनलाइन पसंतीक्रम नोंदविणाऱ्या उमेदवारांसाठीच हा मेळावा घेण्यात येणार आहे. तो www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर होणार आहे.

होमपेजवरील जॉब सीकर लॉगीनमधून युझर आयडी व पासवर्डच्या आधारे लॉगीन करावे. त्यानंतर डॅशबोर्डमधील पंडित दीनदयाळ उपाध्याय जॉब फेअर या बटनावर क्लिक करून प्रथम पुणे विभाग व नंतर पुणे जिल्हा निवडून रोजगार मेळाव्याची निवड करावी. यानंतर उद्योजकनिहाय त्यांच्याकडील रिक्तपदाची निवड करावी. ऑनलाइन पसंतीक्रमानुसार उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीचे ठिकाण आणि वेळ दूरध्वनी, एसएमएस किंवा ई-मेलद्वारे कळविण्यात येईल.

  • नोंदणीसाठी संपर्क : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, ४८१, रास्ता पेठ, पुणे  
  • १५ ते ४५ वयोगटातील सुशिक्षित बेरोजगारांना संधी

कौशल्य विकास अंतर्गत पहिल्या बॅचमध्ये ७४५ इच्छुकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारी मान्यताप्राप्त संस्थांची निवड करण्यात येत आहे. येत्या १५ दिवसांत प्रशिक्षण सुरू होइल. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर संस्थेला संबंधित उमेदवारास रोजगार उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे.
- अनुपमा पवार, सहायक आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Imran Khan Death Claim : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा तुरुंगात मृत्यू ? पत्रकाराच्या दाव्याने खळबळ

मला आजही महागड्याच.... मोहसीनने दुसऱ्या पत्नीसोबत फोटो शेअर करताच उर्मिला मातोंडकरने मारला टोमणा; पोस्ट करत म्हणाली

Tata Sons N Chandrasekaran : टाटा समूहाला मोठा धक्का? चंद्रशेखरन यांच्या राजीनाम्याच्या बातमीने शेअर्स गडगडले, TCS मध्ये मोठी घसरण

Sri Lanka squad for 1st Test vs India: विजय आपलाच... भारताविरुद्धच्या पहिल्या कसोटीतून श्रीलंकेच्या दोन स्टार खेळाडूंची माघार; १५ सदस्यीय संघ जाहीर

हातात पिशव्या, पायात चप्पलही नाही... लोकप्रिय अभिनेत्याची पत्नी चक्क कंडक्टरसोबत पळाली; सीसीटीव्ही फुटेज व्हायरल

SCROLL FOR NEXT