Get the right price for sugarcane otherwise will do the agitation Swabhimani Shetkari Sanghatana 
पुणे

ऊसाला योग्य भाव मिळावा अन्यथा तीव्र आंदोलन : स्वाभिमानी शेतकरी संघटना

दीपक मदने

सांगवी : चालू हंगामात ऊसाला एफ आर पी अधिक 200 रुपये असा दर मिळावा, या मागणीसाठी रविवारी सकाळी 11 वाजता स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून फलटण येथे पुणे- पंढरपूर व बारामती-सांगली मार्गावर क्रां. नाना पाटील चौकात चक्का जाम आंदोलन करण्यात आले. यावेळी ऊसाला दर मिळण्यासाठी कोल्हापूर/सांगली येथील कारखानदार यांनी एकरकमी एफ आर पी देण्याचे मान्य केले. मात्र, सातारा जिल्ह्यातील कारखानदार यांनी भूमिका जाहीर केली नाही. साताऱ्यात होणाऱ्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास उद्यापासून तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी दिला आहे.

या चक्का जाम आंदोलन करतेवेळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वेळीच पोलिसांनी स्वाभिमानी शेतकरी संघटना व पोलिस यांनी चर्चा केली व शांतपणे हे आंदोलन केले जाईल. कोणत्याही प्रकारे कायदा हातात घेणार नाही किंवा सर्वसामान्य लोकांना याचा त्रास होणार नाही असे स्वाभिमानी शेतकरी संघटना यांनी जाहीर केले व चक्का जाम करण्यात आला या वेळी संपूर्ण रस्ते ओस पडले होते.

यानंतर महामुलकर, डॉ. रविंद्र घाडगे, नितीन यादव, प्रमोद गाडे, सचिन खानविलकर, अनिल नाळे यांचेसह सर्व आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेऊन त्यांचेवर कारवाई केली. यावेळी चक्का जाम झाल्याने वाहनांच्या तीन किलोमीटरवर रांगा लागल्या होत्या. मात्र कोणताही अनुचित प्रकार न घडता शांतपणे आंदोलन झाले. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेचे उपअधीक्षक राजेंद्र साळुंखे, पोलिस निरीक्षक प्रकाश सावंत व अधिकारी कर्मचारी यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Narendra Modi: राजकारणाचा खरा पाया कोणता? नरेंद्र मोदींनी दिलेले उत्तर चर्चेत, काँग्रेसवर आगपाखड करत नेमकं काय म्हणाले?

Gautami Patil: ''त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी गेलो तेव्हा...'', पत्रकार परिषद घेऊन गौतमी पाटीलने केला खुलासा

मोठी बातमी! महाराष्ट्रात हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू होणार, पण कधी? प्रकाश आबिटकरांनी दिली माहिती

Viral Video : पोलिसवाल्याने वृद्ध आज्जीसोबत जे केलं ते पाहून रक्त खवळेल; आधी कानाखाली मारली अन् नंतर अंगावार...धक्कादायक व्हिडिओ व्हायरल

ST Bus: दिवाळीसाठी लालपरी सज्ज! मुंबईतून २५० जादा फेऱ्यांचे नियोजन

SCROLL FOR NEXT