Money 
पुणे

प्रशिक्षण, नोकरी अन्‌ मिळवा १० हजारही

सकाळवृत्तसेवा

पुणे - चौथीपर्यंतच शिक्षण झाले आहे.... नोकरी पाहिजे.... काळजी करू नका, उचला फोन आणि फिरवा नंबर.... दोन महिने प्रशिक्षणही मिळेल आणि मुख्य म्हणजे राहण्याची आणि जेवणाचीही सुविधा चक्क मोफत उपलब्ध होणार आहे. अन्‌ त्या काळात स्टायपेंड म्हणून दरमहा १० हजार रुपये मिळणार आहेत. वयाची १८ वर्षे पूर्ण केलेल्या कोणत्याही युवकांना क्रेडाई पुणे मेट्रोकडून ही संधी उपलब्ध झाली आहे. 

कोरोनाच्या आपत्तीच्या काळात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. काहींचे रोजगार बसले आहेत. या काळातच परप्रांतीय कुशल मजूर आपापल्या गावी परतले आहेत. त्यामुळे स्थानिक बेरोजगार युवकांना नोकरीची संधी चालून आली आहे. अट इतकीच आहे की, किमान चौथीपर्यंत शिक्षण झाले पाहिजे अन वयाची १८ वर्षे.

बांधकाम व्यावसायिकांच्या क्रेडाई या संघटनेच्या पुणे मेट्रो कार्यालयाने यासाठी कुशल या उपक्रमांतर्गत पुढाकार घेतला आहे. इच्छुक युवकांना बारबेंडिंग टेक्‍निशियन आणि शटरिंगचे दोन महिन्यांचे प्रशिक्षण पुण्यात दिले जाणार आहे. बाहेरगावच्या युवकांची राहण्याची, चहा- नाष्टा, दोन्ही वेळचे जेवण क्रेडाई पुरविणार आहे. प्रशिक्षण काळात त्यांना दरमहा १० हजार रुपये स्टायपेंडही दिला जाणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना दरमहा किमान १२ ते १५ हजार रुपये पगाराची नोकरीही क्रेडाई मिळवून देणार आहे. एक वर्षांनंतर युवकांना त्यांच्या कौशल्यानुसार दरमहा १५ ते १८ हजार रुपये पगार मिळू शकतो, अशी माहिती क्रेडाईतर्फे देण्यात आली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

प्लंबिंग किंवा इलेट्रिकचा डिप्लोमा झालेल्या युवकांनाही चांगल्या पद्धतीने काम करण्याची ही संधी मिळणार आहे. क्रेडाईने या पूर्वी गवंडीकाम, टाईलिंग, प्लंबिंग, पेंटिंग, सुतार आदींचे प्रशिक्षण युवकांना दिले आहे, असे क्रेडाईकडून सांगण्यात आले.  आता बांधकामे सुरू झाली आहेत. परंतु, कामगारांची टंचाई भासत असल्यामुळे हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. या बाबत अधिक तपशील हवा असल्यास संबंधित युवकांनी मयांक ८३९०९०२५०० किंवा भावेश ९७६७६४५५८९ यांच्याशी मोबाईलवर संपर्क साधावा, असे आवाहन क्रेडाईने केले आहे. 

जिल्हाबंदी सध्या असली तरी नगर, सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर आदी कोणत्याही जिल्ह्यांतून २० युवकांचा गट झाल्यास त्यांना पुण्यात आणण्याची व्यवस्था क्रेडाई करणार आहे. 

कायम रोजगाराची चांगली संधी
क्रेडाई पुणे मेट्रोच्या कुशल उपक्रमाचे प्रमुख जे. पी. श्रॉफ म्हणाले, ‘‘बांधकाम क्षेत्र विस्तारत असल्यामुळे येथे रोजगाराच्या  संधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. प्रशिक्षण काळात स्टायपेंड, राहण्याची आणि जेवणाची व्यवस्था असल्यामुळे युवकांना सोयीचे होऊ शकते. प्रशिक्षणानंतर चांगल्या प्रकारचा रोजगार मिळत असल्यामुळे या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ENG vs IND: आकाश दीपने १० विकेट्ससह विक्रम कामगिरी बहिणीला केली समर्पित! कारणही आहे खूपच भावूक

CA Result: ‘सीए’च्या अंतिम परीक्षेत छत्रपती संभाजीनगरचा राजन काबरा देशात प्रथम; १४ हजार २४७ उमेदवार पात्र ठरले

WTC Points Table: टीम इंडियाने इंग्लंडविरुद्ध दुसऱ्या कसोटीतील विजयासह उघडलं गुणांचं खातं! जाणून घ्या टीम कोणत्या क्रमांकावर

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

SCROLL FOR NEXT