चिखली - महापालिकेच्या स्वस्त घरकुल प्रकल्पात भाजी मंडईची सुविधा नसल्याने सध्या येथे रस्त्यावरच भाजी विक्रेते बसतात. 
पुणे

दीड हजार सदनिकांचे वाटप बाकी

दीपेश सुराणा

पिंपरी - जेएनएनयूआरएम-बीएसयूपी योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी चिखलीतील पेठ क्रमांक १७ व १९ येथे उभारलेल्या स्वस्त घरकुल योजनेत सध्या प्रमुख सुविधांची वानवा आहे. येथे रस्त्यावरच भाजी मंडई भरते आहे. रहिवाशांना शाळा, सांस्कृतिक भवन, दवाखाना, भाजी मंडई आदी प्रमुख सुविधांची गरज आहे. संबंधित प्रकल्पातील पाच हजार ४० सदनिकांचे वाटप पूर्ण झाले आहे. अद्याप एक हजार ५९६ सदनिकांचे वाटप बाकी आहे.

घरकुल प्रकल्प एकूण २५.३० हेक्‍टर क्षेत्रात आहे. त्यातील ५.७ हेक्‍टर जागेत विविध सुविधा विकसित करण्याचे नियोजन आहे. येथे सांस्कृतिक भवन व ग्रंथालय इमारतीच्या पायाचे काम पूर्ण झाले आहे. प्राथमिक व माध्यमिक शाळेचे काम बाकी आहे. भाजी मंडई रस्त्यावर भरते आहे. मंडईसाठी आवश्‍यक आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी बांधकाम परवानगी बाकी आहे. दवाखान्याची निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे. 

घरकुल प्रकल्पात दवाखाना, शाळा, भाजी मंडई आदी सुविधा नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. भाजी मंडईसाठी आम्ही यापूर्वी सहा वेळा पत्रव्यवहार केला आहे. हा प्रश्‍न लवकरात लवकर सुटायला हवा. येथे सीमाभिंत पाडून केलेले रस्ते त्वरित बंद करावेत.
- तुषार सोनवणे, अध्यक्ष, घरकुल समस्यानिवारण समिती

भाजी विक्रेत्यांना रस्त्यावरच बसावे लागते. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवते. येथे भाजी मंडईची सोय व्हावी. विकासकामांसाठी आरक्षित असलेल्या जागांवर बोर्ड लावून संरक्षक भिंत उभारावी.
- किसन शेवते व अण्णा गांगुर्डे, भाजी विक्रेते

घरकुल प्रकल्पात साई चौकापर्यंत येणाऱ्या बस आता प्रकल्पाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत येतात. त्या पूर्ववत साई चौकामध्ये यायला हव्या. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, अपंग, शालेय विद्यार्थी यांची सोय होईल.
- सदाशिव थोरात, ज्येष्ठ नागरिक

घरकुल प्रकल्पातील १६८ सदनिकांची नव्याने सोडत काढली. त्यांचा बांधकाम पूर्णत्व दाखला अद्याप बाकी आहे. त्याशिवाय काही जणांकडून स्वहिस्सा रक्कम येणे बाकी आहे. ज्यांनी स्वहिस्सा रक्कम भरली आहे त्यांना बांधकाम पूर्णत्व दाखला मिळाल्यानंतर घराचा ताबा दिला जाईल. बांधकाम पूर्ण झालेल्या आणखी २०० सदनिकांसाठी महिनाभरात सोडत काढली जाईल.
- चंद्रकांत इंदलकर, सहायक आयुक्त

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pratik Yadav: शरीराच्या ६ भागांवर जखमांच्या खुणा अन्... प्रतीक यादव यांचा मृत्यू कसा झाला? शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं खरं कारण समोर

RCB VS KKR LIVE: रायपूरमध्ये पावसाचा तांडव... अर्ध्यातासात चक्र फिरली... मॅच रद्द झाल्यास काय होईल? प्ले ऑफच्या शर्यतीत ट्विस्ट

'स्ट्रगलर साला'ची तिकडी झळकणार 'मामाच्या गोव्याला जाऊया' तून मोठ्या पडद्यावर !

Mumbai: महिनाभरात दुकानांवर मराठी पाट्या लावा, अन्यथा..., महापालिकेचा दुकानदारांना अंतिम इशारा

एकाच बिल्डिंग मध्ये राहूनही रणबीर आलियाच्या घरी जात नाहीत नीतू कपूर; 'हे' आहे कारण,म्हणाल्या, 'मुलांचं लग्न झाल्यावर...

SCROLL FOR NEXT