पुणे

घाटघरमध्ये आजपर्यंत विक्रमी ४ हजार मिमी पाऊस मुळा धरण ९० टक्के भरले; पाणलोट क्षेत्रात संततधार, नद्यांच्या विसर्गात वाढ

CD

यंदा घाटघरला विक्रमी पावसाची वाटचाल
भंडारदरा, निळवंडे, मुळा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ
अकोले, ता. १९ : जिल्ह्यातील सर्वाधिक पर्जन्यमानासाठी ओळखल्या जाणाऱ्या घाटघर परिसरात यंदा पावसाने विक्रमाची वाटचाल सुरू ठेवली आहे. घाटघर येथे आजपर्यंत तब्बल चार हजार मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली असून, पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या संततधारेमुळे भंडारदरा, निळवंडे आणि मुळा धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होत आहे. मुळा धरणाचा पाणीसाठा ९० टक्क्यांच्या पुढे गेल्याने लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
घाटघर परिसरात पावसाचा जोर कायम असून, परिसरातील जलस्रोत तुडुंब भरले आहेत. घाटघर येथे यंदा आजपर्यंत सुमारे चार हजार मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. रतनवाडी येथेही सुमारे ३ हजार ४४३ मिलिमीटर, पांजरे येथे २ हजार ६२६ मिलिमीटर, भंडारदरा येथे २ हजार ३२० मिलिमीटर, वाकी येथे १ हजार ८४९ मिलिमीटर, निळवंडे येथे १ हजार ९१७ मिलिमीटर, तर अकोले येथे ३४३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आढळा धरण क्षेत्रातही पावसाची नोंद सुरू आहे.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात काल दिवसभर पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. आज सकाळी धरणातील पाणीसाठा सुमारे २३ हजार ९१० दशलक्षघनफूट म्हणजेच ९०.७३ टक्के झाला होता.
पाणलोट क्षेत्रातील जोरदार पावसामुळे मुळा धरणात पाण्याची आवक वाढत आहे. त्यामुळे धरणातून नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून, आवक वाढल्यास विसर्गातही टप्प्याटप्प्याने वाढ होण्याची शक्यता आहे. मुळा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळून सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर वाढला आहे. धरण जवळपास पूर्ण क्षमतेकडे वाटचाल करीत असून, सायंकाळच्या सुमारास धरणातून पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता आहे.

------------
शेतकऱ्यांना दिलासा
यंदाच्या पावसाळ्यात सुरुवातीला पावसाने काहीशी ओढ दिली असली, तरी पश्चिम आदिवासी पट्ट्यात झालेल्या दमदार पावसामुळे धरणसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे रब्बी हंगामासाठी तसेच आगामी उन्हाळ्यातील पाणी नियोजनासाठी शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Axis Bank Credit Card वापरता? नवे नियम लागू होणार; कधीपासून आणि कोणते? जाणून घ्या...

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Marathi News Updates : आज राज्यासह देशात कुठे काय घडलं? जाणून घ्या...

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

SCROLL FOR NEXT