‘घे भरारी’ पथनाट्याद्वारे
नांदगावात जानजागृती
उंडाळे, ता. १८ ः नांदगाव (मनू) येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये कऱ्हाड येथील गांधी फाउंडेशन व पंचायत समितीचा आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने ''माझं गाव आरोग्य संपन्न गाव'' या उपक्रमांतर्गत किशोरी आरोग्य अभियानात घे भरारी पथनाट्य सादर झाले.
किशोरवयीन मुलामुलींची आरोग्यविषयक व सामाजिक जनजागृती करणे, त्यामध्ये ॲनिमिया मुक्त किशोरी, स्वच्छता व आरोग्य, तसेच योग्य आहार, चांगला स्पर्श - वाईट स्पर्श, डिजिटल सुरक्षा व एचपीव्ही लसीकरण अशा विषयावर प्रबोधन करण्यात आले. विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. नांदगावचे सरपंच हंबीरराव पाटील, उपसरपंच शुभांगी माळी, ग्रामपंचायत सदस्य प्रशांत सुकरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र माळी, गांधी फाउंडेशनचे अध्यक्ष धीरज गांधी, सूरज गांधी, काले प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सायली डोंगरे व मुख्याध्यापिका अश्विनी सुकरे व शिक्षक, आशा सेविका उपस्थिती होत्या.
W43112
नांदगाव ः कार्यक्रमप्रसंगी हंबीरराव पाटील, शुभांगी माळी, प्रशांत सुकरे, धीरज गांधी, सूरज गांधी, अश्विनी सुकरे आदी.
.........................................
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.