पुणे

निमगावातील रोहित्र चोऱ्यांमुळे शेतकरी हतबल

CD

टाकळी हाजी, ता. २५ : निमगाव दुडे (ता. शिरूर) गायरान हद्दीतील घोडनदी किनाऱ्यावरील विजेचे तीन रोहित्र मंगळवारी (ता.२४) मध्यरात्री चोरीस गेली. जानेवारी महिन्यापासून घोडनदीकाठ परिसरात तब्बल वीस रोहित्रे चोरीस गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत.
रोहित्रांअभावी कृषिपंप बंद पडले आहेत. नदीत पाणी उपलब्ध असतानाही पाणी उपसा करता येत नसल्याने पिके जळू लागली आहेत.
घोडनदी काठावरील हा परिसर मलठण उपकेंद्राअंतर्गत येतो. चोरीस गेलेले ट्रान्सफॉर्मर २२ केव्ही क्षमतेचे असून त्यामध्ये कॉपरचा वापर असल्याची माहिती आहे. या उपकेंद्रातून आमदाबाद, निमगाव दुडे, रावडेवाडी, कवठे येमाई आदी परिसराला वीजपुरवठा केला जातो. मात्र गेल्या महिनाभरात मोठ्या प्रमाणात रोहित्र चोरी झाल्याने शेती सिंचन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
वारंवार होणाऱ्या रोहित्र चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये पोलिसांबाबतचा असंतोष वाढत असून प्रशासनाने तातडीने कठोर कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

चोरींबाबत संदर्भात जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र गावडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, मलठण उपकेंद्रात नवीन रोहित्र बसवून सर्व रोहित्रे २२ केव्ही ऐवजी ११ केव्हीमध्ये रुपांतरित करावीत. तसेच तांब्याऐवजी ॲल्युमिनियमचा वापर केल्यास चोरीचे प्रकार कमी होतील. शेतकऱ्यांचे नुकसान टाळण्यासाठी तातडीने रोहित्रे द्यावीत, अशी मागणी त्यांनी शिरूरचे उपअभियंता शरद माने व केडगावचे कार्यकारी अभियंता विकास आल्हाट यांच्याकडे केली आहे.

निमगाव दुडे गायरान जमिनीवर शेतकऱ्यांच्या पंपासाठी बसविलेले तीन रोहित्र एकाच वेळी चोरीस गेले आहे. याबाबत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या रोहित्राद्वारे दुडेवाडी व रावडेवाडी परिसरातील शेतकऱ्यांना घोड नदीतून पाणीपुरवठा केला जात होता.
- एस. मुरकुटे, शाखा अभियंता, विद्युत वितरण कंपनी

00892

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Son kills mother Sangli : बायकोसाठी मुलाने आईचा गळा दाबला, मृतदेहाशेजारीच रात्रभर झोपला अन्...; नंतर आई आईचा आक्रोश

Jal Jeevan Mission: राज्याचे ‘जलजीवन’ निधीच्या प्रतीक्षेत; २४ हजार योजनांची कामे ठप्प, केंद्राकडून केवळ साडेबारा कोटी मिळाले..

Latest Marathi News Live Update : IT कंपनीतील धर्मांतरप्रकरणी राष्ट्रीय महिला आयोगाची टीम आज नाशिकमध्ये येणार

Akola News: नुकसान भरपाईचा खेळखंडोबा; प्रीमियमच्या बदल्यात निराशा; पिक विमा योजना शेतकऱ्यांसाठी कागदोपत्रीच

America-Iran War: युद्ध थांबणार! अण्वस्त्रांसंबंधीची सर्वात मोठी अट इराणने केली मान्य; अमेरिकेचा दावा

SCROLL FOR NEXT