पुणे

दारूसाठी पैसे न दिल्याने घोडेगावात एकाचा खून

CD

घोडेगाव, ता. १३ : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्याने ५७ वर्षीय व्यक्तीची मारहाण करून हत्या करणाऱ्या आरोपीला घोडेगाव पोलिसांनी तातडीने अटक केली. तर न्यायालयाने आरोपीला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
महेंद्र सुभाष शिंदे (रा. वडारगल्ली, घोडेगाव) असे कोठडी सुनावलेल्याचे तर राजेंद्र रघुनाथ सहाणे असे मृताचे नाव आहे. घोडेगाव येथील देशी दारू दुकानाच्या गेटजवळ मंगळवारी (ता. १२) सकाळी सहाणे बेशुद्ध अवस्थेत सापडले होते, त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, शवविच्छेदन अहवाल, साक्षीदारांच्या माहितीवरून एका व्यक्तीने मारहाण केल्यामुळे सहाणे यांचा मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाले. या अनुषंगाने आरोपीचा शोध घेण्यासाठी घोडेगाव पोलिस ठाण्यातील अधिकारी व अंमलदार यांचे वेगवेगळी पथके तयार करून संशयित महेंद्र शिंदेला ताब्यात घेतले त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने मारहाण करून ठार मारल्याचे कबूल केले.
आरोपीवर यापूर्वीही गंभीर गुन्हे दाखल असून पोलिस अधीक्षक संदीपसिंग गिल यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सागर पवार पुढील तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

Agriculture Day Celebration: घोडेगावात कृषी दिन उत्साहात साजरा; आधुनिक तंत्रज्ञान, सामाजिक संस्थांच्या सहकार्याने शेतकऱ्यांचा सन्मान

Navi Mumbai: नवी मुंबईत धक्कादायक घटना; विजेचा शॉक लागून दोन कॉलेज विद्यार्थिनी पाण्यात पडल्या; घटनेनं खळबळ

श्रीसंतला मोठा दिसाला! KCA ने घातलेली तीन वर्षांची बंदी उठवली, नेमका काय होता आरोप?

SCROLL FOR NEXT