चंद्रकांत घोडेकर : सकाळ वृत्तसेवा
घोडेगाव, ता. १९ : घोडेगाव (ता. आंबेगाव) येथील निवासी शासकीय माध्यमिक इंग्रजी माध्यम आश्रमशाळा येथे विद्यार्थी सुरक्षा, स्वच्छता व आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य प्रशासनाने दिले आहे. आश्रमशाळेत निवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या, स्वच्छता व आरोग्याच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेण्यात येत आहे.
शाळेचा परिसर मोठा व निसर्गरम्य असून परिसरात झाडी व मोकळी जागा असल्याने सर्प व इतर सरपटणाऱ्या प्राण्यांचा संभाव्य धोका लक्षात घेऊन परिसराची नियमित पाहणी, गवत व झुडपांची स्वच्छता आणि धोकादायक ठिकाणांची तपासणी केली जाते. जिल्ह्यातील ही पहिली व राज्याची दुसरी इंग्रजी माध्यमिक आश्रमशाळा आहे. शाळेची इमारत सन २०१७ मध्ये वापरण्यासाठी सुरू करण्यात आली. सध्या येथे ४०६ विद्यार्थी शिक्षण घेतात.
दरम्यान, शाळेच्या आजूबाजूला गवत काढण्यासाठी औषध फवारणी करून घेतली आहे. वसतिगृहाच्या परिसरातील गवत कर्मचाऱ्यांकडून काढले जाते. विद्यार्थ्यांवरील प्राथमिक तसेच तातडीच्या उपचारासाठी लांडेवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र तसेच घोडेगाव या ठिकाणी संपर्क केला जातो.
संवेदनशील ठिकाणांची नियमित पाहणी
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वसतिगृह, शाळा परिसर, पाणीपुरवठा व्यवस्था, स्वच्छतागृहे व इतर संवेदनशील ठिकाणांची नियमित पाहणी करण्यात येत असून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत.
कसल्याही परिस्थितीमध्ये जंगली श्वापदांपासून त्यांना त्रास होऊ शकत नाही. आजूबाजूच्या परिसरात साप आढळत नाहीत. त्यासाठी थायमेट मारले जाते.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी
सर्पदंश प्रतिबंधाबाबत आवश्यक सूचना, जनजागृती
शाळेला कुंपणासह संरक्षक भिंत
विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी २२ कॅमेरे कार्यरत
परवानगी घेऊनच पालक, नागरिकांना प्रवेश
दृष्टिक्षेपात
मुला-मुलींच्या वसतिगृहासाठी अधीक्षक व अधीक्षिका
रात्रीच्या वेळेला पहारेकरी
औषधोपचारासाठी २४ तास परिचारिकेची व्यवस्था
शाळेच्या शेजारी विशेष घनदाट झाडी नाही
अत्यावश्यक सुविधा, स्वच्छ पिण्याचे पाणी
भोजनासाठीची व्यवस्था त्याचबरोबर बंक बेड
निवासी विद्यार्थी
२०९.......मुले
१९७..... मुली
रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था व देखरेखीवरही विशेष लक्ष दिले जात आहे. त्याचबरोबर शाळा व वसतिगृह परिसरात नियमित स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, गवत व झाडाझुडपांची निगा यावर विशेष भर देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांचे शिक्षण सुरक्षित आणि निरोगी वातावरणात व्हावे, यासाठी ‘सुरक्षित विद्यार्थी-स्वच्छ परिसर-गुणवत्तापूर्ण शिक्षण’ या त्रिसूत्रीवर शाळा प्रशासन कार्यरत आहे.
- गणेश गावडे, मुख्याध्यापक
शाळेत आवश्यक डिजिटलसह विविध सोयी-सुविधा आहेत. येथे उपक्रम राबवले जातात. गुणवत्तेबरोबरच आमची सुरक्षा व आरोग्याची काळजी सर्व शिक्षक व कर्मचारी घेतात.
- रिया तिटकारे, विद्यार्थिनी, इयत्ता सातवी
आश्रमशाळेमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच संस्कार व आरोग्याचे धडे दिले जातात. विद्यार्थ्यांच्या आरोग्य व सुरक्षिततेला प्राधान्य दिले जाते. शाळेत आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध आहेत. शालेय व वसतिगृह इमारत प्रशस्त असून आवश्यक सुविधा व साहित्य उपलब्ध आहे.
- पांडुरंग माळी, पालक
05130, 05131
05130, 05131
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.