पुणे

घोरावडेश्वर पायथ्याशी बसथांब्यातच वाहनांचे अतिक्रमण

CD

सोमाटणे, ता. १० : घोरावडेश्वर पायथा (पुणे-मुंबई महामार्ग) येथे भाविक आणि प्रवाशांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या बसथांबा निवारा शेडमध्ये पर्यटकांकडून वाहने पार्क केली जात आहेत. यामुळे प्रवासी आणि भाविकांना निवारा शेडचा आश्रय न मिळता भर पावसात रस्त्यावर ताटकळत उभे राहावे लागत आहे. या मनमानी कारभारामुळे प्रवासी आणि दर्शनासाठी येणारे भाविक तीव्र संताप व्यक्त करत आहेत.
घोरावडेश्वर मंदिरात दर्शनासाठी ये-जा करणाऱ्या भाविकांना तसेच महामार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना ऊन, वारा आणि पावसापासून दिलासा मिळावा, या उद्देशाने ‘घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठान’चे अध्यक्ष रघुवीर शेलार, संचालक किसन भेगडे, सतीश आग्रवाल आणि ‘आरएमके स्पेश’ यांच्या सहकार्याने या बसथांबा निवारा शेडची उभारणी करण्यात आली होती. या शेडमुळे प्रवाशांची मोठी सोय झाली होती.

पर्यटकांकडून शेडचा ताबा!
सध्या मावळात पाऊस सुरू असल्याने पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मात्र, मावळात जाणाऱ्या काही हुल्लडबाज तरुण आणि पर्यटकांनी या बसथांब्याचाच ताबा घेऊन थेट शेडच्या आतच दुचाकी व चारचाकी वाहने पार्क करण्यास सुरुवात केली आहे. हा प्रकार पाऊस सुरू झाल्यापासून दररोजच घडत आहे. याचा सर्वाधिक त्रास ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना सहन करावा लागत आहे. त्यामुळे पोलिस प्रशासन आणि घोरावडेश्वर विकास प्रतिष्ठानने या अतिक्रमणावर तातडीने तोडगा काढून बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई करावी, अशी मागणी भाविक व नागरिकांकडून केली जात आहे.

PNE26W41318
---

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

विरोधकांसमोर मोदी सरकार झुकलं! विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जबाबत अमित शहा संसदेत देणार निवदेन, नेमकं काय घडतंय?

Google Drive Update: 10 ऑगस्टपासून फोटो बॅकअप बंद! Google Drive युजर्सनी फोटो-व्हिडिओ सुरक्षित ठेवण्यासाठी 'ही' सेटिंग लगेच बदला

बर्थडेला शेतात राबली प्राजक्ता माळी; ‘शेतकरी प्रमाणपत्र आहेच’ म्हणत केली भात लावणी, Viral Video

6,6,6,6,6,6! सहा चेंडू, सहा षटकार... युवराज सिंगसारखी तुफान फटकेबाजी, पण इंग्लंडच्या फलंदाजाचा हा पराक्रम आहे थोडा वेगळा Video

Marathi News Live Updates : १८ जण जखमी, चौघांची प्रकृती गंभीर, आसाम आणि अरुणाचल सीमेवर तणाव

SCROLL FOR NEXT