Pune Crime News sakal
पुणे

Pune Crime News: महिलेच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा प्रयत्न

बलात्काराची केस मागे घ्यावी, यासाठी महिलेला धमकावुन तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार घोरपडी येथे घडला आहे.

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी (Pune Crime News)- बलात्काराची केस मागे घ्यावी, यासाठी महिलेला धमकावुन तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. हा प्रकार मुंढव्यातील भीमनगरमध्ये बुधवारी सकाळी साडेअकरा वाजता घडला.

याप्रकरणी मुंढवा पोलिसांनी रमजान खलील पटेल (वय ६०, रा. भिमनगर, मुंढवा) याच्यावर खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याविषयी भीमनगर येथील एका ३८ वर्षाच्या महिलेने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास आरोपीने महिलेला तू दाखल केलेली बलात्काराची तक्रार पाठीमागे घे म्हणत पिढी तिच्या अंगावर रॉकेल टाकून पेटवून देण्याचा केला प्रयत्न केला.

ही तक्रार मागे घेण्यासाठी आरोपी पीडित महिलेच्या गेल्या अनेक दिवसापासून तगादा लावला होता.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला पतीपासून विभक्त रहात आहे. तो फिर्यादी यांना बार्शीला घेऊन गेला व तेथे त्याने फिर्यादी यांच्यावर बलात्कार केला.

त्याबाबत त्यांनी २०१८ मध्ये पांगरी पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्याची येत्या २३ जानेवारीला तारीख आहे. त्यावरून त्यांच्यात वाद झाला त्यातून हा प्रकार घडला आहे.

यासंदर्भात अधिक तपास मुंढवा पोलीस करत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Stock Market Today : शेअर बाजाराची लाल रंगात सुरुवात मात्र काही मिनिटांतच तेजीत! कोणते शेअर्स वाढले?

MPSC Success Story: वीटभट्टी कामगाराच्या मुलाची जिद्दीने यशाला गवसणी; एमपीएससी परीक्षेतून बनला कृषी उपसंचालक, आई-वडीलांनी उपाशी राहून दिलं शिक्षण!

विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! पाठ्यपुस्तकांबरोबर आता दफ्तरही मिळणार मोफत; ४२ लाख विद्यार्थ्यांना होणार फायदा

Latest Marathi News Update: काँग्रेस भवनात दगडफेक प्रकरणी १०० पेक्षा जास्त जणांवर गुन्हा

Kolhapur Crime : आठ दिवस भीतीत, सोने विकल्यानंतर बिनधास्त; अखेर पंचवीस दिवसांनी संशयित पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT