Pune Municipal Corporation Sakal
पुणे

Railway Fly Over : घोरपडी उड्डाणपुलाच्या कामाला फेब्रुवारीपूर्वी सुरुवात

घोरपडी येथे पुणे मिरज लोहमार्गाच्यावर उड्डाणपूल (रेल्वे ओव्हर ब्रीज-आरओबी) बांधण्यासाठी लष्कराकडून भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - घोरपडी येथे पुणे मिरज लोहमार्गाच्यावर उड्डाणपूल (रेल्वे ओव्हर ब्रीज-आरओबी) बांधण्यासाठी लष्कराकडून भूसंपादनाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्याबद्दल महापालिकेकडून लष्कराला क्वार्टर बांधून देणे, सेवावाहिन्याची व्यवस्था करणे यासह रोख मोबदला देण्यात येणार आहे. या कामासाठी सध्या निविदा प्रक्रिया सुरु आहे. फेब्रुवारी महिन्यापूर्वी ठेकेदार कार्यादेश दिले जातील, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

पुणे मिरज लोहमार्गावरील ‘आरोबी’साठी नुकतीच लष्कराचे अधिकारी व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यामध्ये या प्रकल्पासंदर्भात आढावा घेण्यात आला आहे. हा रेल्वेपूल बांधताना यामध्ये यामध्ये पुणे कॅन्टोन्मेंट, रेल्वे विभाग याची जागा आवश्‍यक आहे. संरक्षण विभागाने २०१६ मध्येच कॅन्टोन्मेंटची ४ हजार ५६० चौरस मिटर जागा हस्तांतरित करण्यासाठी परवानगी दिलेली आहे.

दरम्यान, यापूर्वी पुणे सोलापूर या लोहमार्गावरील पुलाचे काम महापालिकेने सुरु केले असून, त्याचे काम ७० टक्के पूर्ण झालेले आहे. त्यामुळे आता पुणे मिरज लोहमार्गावरील पूल बांधण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे.

या कामासाठी निविदा काढण्यात आली असून, महापालिकेने या कामाचा खर्च ४८ कोटी रुपये इतका निश्‍चित केला आहे. फेब्रुवारी महिन्यापर्यंत या कामाच्या ठेकेदाराची निवड करून कार्यारंभ करण्याचे आदेश दिले जातील. या रेल्वेपुलाची एकूण लांबी ६३६ मिटर इतकी असून रुंदी साडेदहा मीटर इतकी असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Yashasvi Jaiswal ला यष्टिरक्षण का करावसं वाटतंय? हे भलतंय खूळ डोक्यात येण्याचं कारण, घ्या जाणून...

Successful Investment: बाबो! ही महिला चक्क पार्किंगमधून कमावते लाखो रुपये; नेमका काय आहे बिझनेस?

अंतराळात तयार होणार स्कॉच व्हिस्की! कुणाला प्यायला मिळणार? ‘स्पेस पफिन’ मिशन नेमकं काय?

Latest Marathi News Live Update : वकिलांशी कथित गैरवर्तन; सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनकडून निषेध

FDA Action: खाद्यतेलाच्या साठ्यांवर छापा, 'एफडीए'च्या कारवाईत १.२८ कोटींचा साठा जप्त

SCROLL FOR NEXT