Pune Monsoon Trouble Sakal
पुणे

Ghorpadi Road Issue : घोरपडी परिसरात रस्ते गेले खड्ड्यांत, वाहनचालकांसह पादचाऱ्यांची कसरत; प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांत संताप

Pune Monsoon Trouble : घोरपडीतील महत्त्वाचा रस्ता पावसात उध्वस्त झाला असून, PMC आणि कँटोन्मेंट बोर्डमधील जबाबदारीच्या टोलवाटोळीमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत.

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी : पावसाळा सुरू होताच घोरपडी परिसरातील रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विशेषतः गावातील रस्ता अत्यंत धोकादायक बनला आहे. या रस्त्यावर अनेक खड्डे निर्माण झाले असून, त्यात पावसाचे पाणी साचल्याने वाहनचालकांसह पादचाऱ्यांचे प्रचंड हाल होत आहेत.

गावातील हा रस्ता मार्च महिन्यामध्ये बनविण्यात आला होता, परंतु चार महिन्यांतच त्याची चाळण झाली आहे. काही ठिकाणी खड्डे इतके खोल आहेत की, त्यामध्ये दुचाकी वाहने चाक अडकल्याने लहान-मोठे अपघातही घडले आहेत. या रस्त्यावरून दररोज हजारो वाहनांची वर्दळ असते. हा रस्ता घोरपडीतून लष्कर, पुणे स्टेशन, खराडी, मुंढवा, कोरेगाव पार्क परिसराला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे.

अशा परिस्थितीतदेखील प्रशासनाकडून रस्त्याच्या देखभालीसाठी कुठलेही ठोस पावले उचलली गेलेली नाहीत. काही दिवसांपूर्वी तात्पुरती डागडुजी केली होती, परंतु काही दिवसांत परिस्थिती ‘जैसे थे’ झाली आहे. हा रस्ता पुणे कँन्टोन्मेंटच्या अखत्यारित येत असून, सध्या उड्डाण पुलाच्या कामासाठी रस्ता पुणे महापालिकेकडे सुपूर्द केला आहे. त्यामुळे दुरुस्ती करायची कोणी? यावरून टोलवाटोलवी सुरू आहे.

रस्त्यासंदर्भात पुणे कँन्टोन्मेंटच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता नाव न प्रसिद्ध करण्याच्या अटीवर त्यांनी सांगितले की, सध्या रस्त्याचा ताबा महापालिकेकडे आहे, रस्ता दुरुस्त करण्यासाठी व विविध प्रश्नांसाठी संयुक्त पाहणी झाली आहे, त्यानुसार लवकरच कार्यवाही होईल.

डागडुजीवर भर

घोरपडी गावातील रेल्वेच्या जागेवरील अतिक्रमण साधारण तीन वर्षांपूर्वी काढले. त्याठिकाणी असलेली जलवाहिनीला गळती लागली आहे, तेव्हापासून वाहिनीची दुरुस्ती झालीच नाही. रस्त्यावर नियमित पाणी साचत आहे.आतापर्यंत लाखो लिटर पिण्याचे पाण्याचा अपव्यय झाला आहे. अनेकदा पाणीपुरवठा अधिकाऱ्यांनी पाहणी केली, परंतु कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आल्या नाहीत. त्यामुळे तीन वर्षांपासून रस्त्याच्या कडेला पाणी साचत आहे. यामुळे रस्ता कितीही दुरुस्त केला तर काही महिन्यांत पुन्हा खड्डेमय होत आहे.

दरवर्षी पावसाळा आला की घोरपडी गावातील रस्त्यांची अवस्था अशीच होते. अनेक तक्रारी करूनही कोणी दखल घेत नाही. लहान मुले, वृद्ध, महिलांना रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. अनेकदा वाहनचालकांचे अपघात झाले आहेत. रस्त्याची तात्पुरती डागडुजी न करता पुन्हा संपूर्णपणे नव्याने डांबरीकरण करण्यात यावा.

- चंदू खुणेकरी, स्थानिक नागरिक

घोरपडीतील रस्त्यासंदर्भात तक्रार प्राप्त झाली आहे. पावसामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यास विलंब होत आहेत. सांडपाण्याची वाहिनी टाकल्यानंत पुढच्या आठवड्यात रस्ता दुरुस्ती करण्यात येईल.

- सचिन पवार, प्रकल्प व्यवस्थापक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur Flood News : रात्रीपासून घरं पाण्याखाली, झोपायलाही जागा नाही...नागपूरच्या हुडकेश्वरमध्ये पोहरा नदीला पूर; रेस्कू ऑपरेशन सुरु

Basmat Crime : उसने दिलेले १००० रुपये मागितल्याच्या कारणावरून एकास चाकूने भोसकले; वसमत तालुक्यातील चंदगव्हाण येथील घटना

युझवेंद्र चहलची कथित गर्लफ्रेंड RJ Mahvash बनली क्रिकेट संघाची मालकीण; फिरकीपटूने लगेच केलं Like

Latest Maharashtra News Live Updates : शिक्षकांच्या संघर्षाला शरद पवारांचा पाठिंबा; आझाद मैदानावर दिली हजेरी

Agriculture News : ‘त्या’ शेतकऱ्याची मानवाधिकार आयोगाकडून दखल, लातूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नोटीस; दोन आठवड्यांत अहवाल देण्याचे आदेश

SCROLL FOR NEXT