Fire brigade sakal media
पुणे

घोरपडी : ओढ्यात पडलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या जवानांनी काढले बाहेर

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी : येथील श्रीनाथ भाजी मंडईच्या (Vegetable Market) मागे असलेल्या ओढ्यामध्ये पडलेल्या व्यक्तीला अग्निशमन दलाच्या (fire brigade Authorities) मदतीने बाहेर काढण्यात आले. घोरपडीमध्ये राहणारे बबन चोरगे (baban chorge) अचानक ओढ्यात पडले (collapse in water) होते. एक तासाच्या अथक प्रयत्नांनी त्यांना सुखरूप बाहेर काढले.

शनिवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास एक वयस्कर व्यक्ती पाय घसरुन पडली. बाहेर पडण्यास मार्ग नसल्यामुळे जवळपास एक तास चोरगे ओढ्यामध्ये अडकून पडले होते. अखेर सात वाजता त्या रस्त्यावरून जाणा-या एका व्यक्तीला ओढ्यातून वाचवा वाचवा आवाज ऐकू आला. त्यामुळे आजूबाजूला लोक जमले त्याला ओढ्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. पण बाहेर काढण्यास अडचणी येत असल्याने नागरिकांनी स्थानिक पोलिस व अग्निशमन दलाला संपर्क केला.

काही वेळातच जवान घटनास्थळी पोहचले व शर्थीचे प्रयत्न करुन त्या व्यक्तीला ओढ्याच्या बाहेर काढले. ओढ्यात पडल्यामुळे चोरगे अतिशय घाबरला होते. ओढा २० ते ३० फूट खोल असल्याने त्या व्यक्तीला शिडीच्या साहाय्याने फायरमन महेंद्र महामुनी खांद्यावर बसून बाहेर काढले. त्यांना सुखरूप बाहेर काढण्यावर सर्वांनी टाळ्या वाजवून आनंद व्यक्त केला. पुणे कॅन्टोमेंट बोर्डाच्या अग्निशमन दलातील इमरान तांबोळी, तांडेल दिपक बद्दलवार, फायरमन अभिजीत घुमटकर, महेंद्र महामुनी, सिद्धी गिलबिले, पंकज रसाळ, अजय इथापे यांनी ही कामगिरी केली. चोरगे यांना सुखरूप बाहेर काढल्यामुळे स्थानिक नागरिक चंदू खुनेकरी, योगेश घोडके दिपक फडतरे इतरांनी अग्निशमन दलाच्या जवानांचा सत्कार केला व त्यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SA: शतक झळकावल्यावर विराट कोहलीचा मैदानावर नागीण डान्स, Video होतोय तुफान व्हायरल

Latest Marathi News Live Update : तपोवiनातील वृक्षतोडीविरोधात सीटू संघटना आक्रमक; आंदोलनाला मिळतोय वाढता पाठिंबा

Sushma Swaraj: सुषमा स्वराज यांचे पती स्वराज कौशल यांचे निधन; ज्येष्ठ वकील, माजी राज्यपाल अन्... 'अशी' होती कारकिर्द

Bharat Taxi Launch : झिरो कमिशनसोबत ‘भारत टॅक्सी’ सेवा लॉन्च; मिळणार अल्प दरात राइड्स, जाणून घ्या दर आणि बुकिंग प्रक्रिया

Ashes: मिचेल स्टार्कनं इतिहास घडवला; हॅरी ब्रुकची विकेट घेऊन वसिम अक्रमचा विक्रम मोडला, पाकिस्तानी दिग्गज म्हणाला...

SCROLL FOR NEXT