four generations celebrated Yoga Day sakal
पुणे

International Yoga Day : चार पिढ्यातील महिलांनी एकत्र साजरा केला योग दिन

दरवर्षी २१ जून रोजी देश आणि जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे.

सकाळ वृत्तसेवा

घोरपडी - दरवर्षी २१ जून रोजी देश आणि जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्यासाठी योग महत्त्वाचा आहे.

योगाचे हे महत्त्व पटवून देण्यासाठी तसेच लोकांमध्ये त्याविषयी जनजागृती करण्यासाठी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येत आहे. या निमित्त विविध ठिकाणी योग अभ्यास करण्यात येतो.

आज घोरपडी बाजार परिसरात राहणाऱ्या व्यावसायिक सुनंदा राक्षे यांच्या कुटुंबातील चार पिढ्यानी एकत्र योग अभ्यास केला. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त त्यांची आई , मुलगी, नात त्यांच्यासोबत योग दिवस साजरा केला.

सुनंदा राक्षे त्यांची आई चंद्रभागा होळकर साधारण ऐंशी वर्षाच्या असून, गेल्या सात वर्षांपासून नियमित योग करतात. त्यामुळे मुलगी मीनल ननवरे, व नात जुई ननवरे यांनाही नियमित योग करायची सवय लागली आहे. त्यांनी आज योग दिनानिमित्त सूर्यनमस्कार ताडासन, वृक्षासन, विरासन, वीरभद्रासन तसेच व्याघ्रमुद्रा आणि भ्रामरी, अनुलोम, विलोम प्राणायाम असे विविध योग प्रकार केले.

सुनंदा राक्षे, योग अभ्यासक -

योगाद्वारे महिलांना शारीरिक व्याधी कमी करण्यासाठी मदत होते. नियमित योगासने केल्याने आपले आरोग्य सुदृढ राहते. त्यामुळे मी व माझे कुटूंबिय योग करतो, तसेच इतरांना पण योग करण्यास प्रोत्साहन देत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

8th Pay Commission Update: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! दसऱ्यानंतर मुंबईत महत्त्वाची बैठक; पगारवाढ आणि DAबाबत काय चर्चा होणार?

VIDEO: दुष्काळाच्या बैठकीला दोन्ही उपमुख्यमंत्री गैरहजर; महायुतीत नाराजीनाट्याची चर्चा

Masur Fox Attack: मसूरमध्ये कोल्ह्यांची दहशत! वृद्धासह चिमुकली, महिला आणि शेतकऱ्यावर हल्ले

Latest Marathi News Live Update : सोमेश्वर कारखाना निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचे खाते उघडले; संग्राम सोरटे विजयी

Truck Fire: राष्ट्रीय महामार्गावर धावत्या ट्रकला आग

SCROLL FOR NEXT