गळफास! sakal
पुणे

Pune : घोरपडीत तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा

पुणे : कंपनीच्या ग्राहकाचे परस्पर घेतलेले पैसे परत करूनही कंपनीकडून तील कर्मचाऱ्यांकडून पैशांची मागणी होत असल्याने तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. घोरपडी येथे गुरुवारी (ता. २८) ही घटना घडली.
आशिष व्यंकट कामनबोयना (वय १९, रा. घोरपडी गाव) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी सुजाता कामनबोयना यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार
यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी कंपनीच्या व्यवस्थापक ऐश्‍वर्या जोशी यांच्यासह पाच जणांवर मुंढवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी यांचा मुलगा आशिष हा यश ज्योती डेबीट कन्सल्टन्सी या कंपनीमध्ये कामाला होता. त्याने कंपनीच्या एका ग्राहकाचे ३० हजार रुपये परस्पर घेतले होते. याबाबतची माहिती व्यवस्थापक जोशी यांना मिळाली. दरम्यान, आशिषवर कारवाई होऊ नये, यासाठी फिर्यादी व आशिष या दोघांनी कंपनीमध्ये जाऊन तीस हजार रुपयांची रक्कम पुन्हा जमा केली होती. मात्र जोशी व त्यांच्या सहकाऱ्यांनी आशिषला कंपनीत बोलावून घेत त्याने आणखी रक्कम घेतल्याचा आरोप केला. यामुळे आशिषला मानसिक त्रास झाला. त्याला कंटाळून त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT