पुणे

सातारा आले पिक दर स्थिती

CD

पान २
-------------
आले पिकाच्या दरात स्थिरता

- प्रति गाडीस (५०० किलो) ५८ ते ५९ हजार रुपये दर
- बेंगलोरी आल्याची आवक वाढली

विकास जाधव : ॲग्रोवन वृत्तसेवा
सातारा : जुलै महिन्यापासून आले पिकाच्या बाजारभावात स्थिरता पाहायला मिळत असून, सध्या बाजारात प्रति गाडी (५०० किलो) ५८ ते ५९ हजार रुपये दर मिळत आहे.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या बेंगलोरी आल्याची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याने स्थानिक दरांवर अल्पसा परिणाम झाला असला, तरी गेल्या महिनाभरापासून टिकून असलेल्या या दरामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
राज्यभरात सातारी आले पिकाची स्वतंत्र ओळख आहे. चवीने तिखट असल्याने येथील आल्याला मोठी मागणी असते. जिल्ह्यात गत वर्षी सुमारे तीन हजार हेक्टरवर पिकाची लागवड झाल्याचा अंदाज आहे. गत वर्षी डिसेंबर महिन्यापासून दरात सुधारणा होण्यास सुरुवात झाली. त्या वेळी प्रति गाडीस १५ ते १८ हजार रुपये दर मिळत होता. मे महिन्यात आले बियाण्यास प्रति गाडी २२ ते २५ हजार रुपये दर मिळाला होता. जून महिन्यात टप्प्याटप्प्याने दरात सुधारणा होत गेली.
जुलै महिन्याच्या सुरुवातीस आल्याला सर्वाधिक विक्रमी म्हणजे प्रति गाडी ७५ हजार रुपये दर मिळाला होता. काही शेतकऱ्यांना प्रति गाडी ८० हजार रुपयांपर्यंत दर मिळाला. मात्र हा दर फार काळ टिकला नसून अवघे आठ ते दहा दिवसच मिळाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. त्यानंतर बेंगलोरी आल्याची आवक सुरू झाल्याने दरात घसरण झाल्याचे खरेदीदार व्यापाऱ्यांनी सांगितले.
सध्या बेंगलोरी आल्याची आवक मुंबईत मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच दर वाढल्याने बाजारपेठेतील मागणी काहीशी कमी झाली असून, त्याचा खरेदी-विक्रीवर परिणाम झाला आहे. विक्रमी दर जास्त दिवस टिकले नसले, तरी सध्या मिळत असलेले दर मागील दोन वर्षांच्या तुलनेत समाधानकारक असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
सध्या जुन्या आल्याला प्रति गाडीस ५८ ते ५९ हजार रुपये दर मिळत आहे. नवीन आल्याची खरेदी स्वतंत्रपणे होत असून, त्याला प्रति गाडी २२ ते २३ हजार रुपये दर मिळत आहे. आगामी काळात बेंगलोरी आल्याच्या आवकेवर स्थानिक दराचे चित्र अवलंबून राहणार असल्याचे आले खरेदीदार व्यापाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

W40374
शेंद्रे, ता. सातारा ः येथे आले काढणीच्या कामात व्यग्र मजूर.
-----

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amazon Great Freedom Sale 2026: आजपासून मेगा सेल! Galaxy S25 Ultra 40 हजारांनी स्वस्त, पाहा कोणत्या वस्तूंवर मिळतोय मोठा डिस्काउंट

Koyna Dam Tailrace Water Issue : समुद्रात जाणारे कोयनेचे पाणी कोकणाला मिळणार का? पुन्हा नवे सर्वेक्षण सुरू; 'हा' निर्णय ठरवणार भविष्य

Mumbai News: 'स्वातंत्र्यदिनापूर्वी मोठी घटना घडणार, मुंबईत बॉम्बस्फोट करणार...', महापौर रितू तावडेंना धमकीचा मेल

Marathi News Live Updates : सीएसएमटी स्थानकातील वायफायवर सायबर हल्ला

Dr Bhushan Patwardhan: प्रज्ञानातून मानवकल्याणाचा भाव जागृत होईल: डॉ. भूषण पटवर्धन, ‘सकाळ प्रकाशन’तर्फे तीन पुस्तकांचे प्रकाशन

SCROLL FOR NEXT