Gir cows and Sanen goats will be distributed to the farmers in Village 
पुणे

ग्रामीण भागात दुग्ध व्यवसायातून मिळणार चालना; शेतकऱ्यांना देणार 'गिर गाई' व 'सानेन शेळ्या्'

जनार्दन दांडगे

उरुळी कांचन (पुणे) : राज्याच्या पशुधन विकास महामंडळांच्या माध्यमातून दिवसाला वीस लिटर दुध देणारी गिर जातीची गाई व दिवसाला दहा ते बारा लिटर दुध देणारी सानेन जातीची शेळी' विकसीत करण्याचे काम मागील काही दिवसापासून युद्दपातळीवर सुरु आहे. या कामात उरुळी कांचन (ता. हवेली) येथील बायफ संस्थेचीही मदत घेतली जाणार आहे. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना गिर जातीची गाई व सानेन जातीच्या शेळ्या्ंचे वाटप करण्यात येणार आहे.

''जादा दुध देणारी गिर गाई व सानेन शेळीमुळे राज्यात दुधाचे उत्पादन वाढण्याबरोबरच, दुग्ध व्यवसायातून मिळणाऱ्या पैशामुळे ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था मजबुत होण्यासाठी मदत होणार आहे'' असे मत राज्याचे क्रिडा व पशु संवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी उरुळी कांचन (ता. हवेली) येथे व्यक्त केले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

राज्याचे क्रिडा व पशु संवर्धन मंत्री सुनिल केदार यांनी, आमदार अशोक पवार यांच्या समवेत शुक्रवारी (ता. २६) सायंकाळी उरुळी कांचन येथील बायफ (बायफ विकास अनुसधान प्रतिष्ठान) या संस्थेस भेट दिली. यावेळी सुनिल केदार यांनी बायफ संस्थेकडुन गिर गाई व सानेन शेळीवर करण्यात येत असलेल्या संशोधनाबाबत माहिती घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना केदार यांनी वरील मत व्यक्त केले. 

यावेळी बोलताना केदार म्हणाले, ''ब्राझील या देशाने सुमारे वीस वर्षापुर्वी आपल्या देशातून गिर गाई नेल्या होत्या. मागील वीस वर्षाच्या काळात ब्राझील या देशातील संशोधकांनी गिर गाईवर वेगवेगळे प्रयोग करुन, गाईंचे दुध प्रतीदिन वीस लिटरवर नेले आहे. ब्राझील या देशाने विकसीत केलेली दिवसाला वीस लिटर दुध देणारी गिर जातीची गाई राज्यात आणून, आपल्याकडेही दिवसाला गिर गाई जास्तीत जास्त दुध कसे देईल याचे संशोधन पशुधन विकास महामंडळांच्या माध्यमातून मागिल काही महिन्यांपासुन सुरु आहे. हे काम अंतिम टप्प्यात आहे. याच पध्दतीचे काम उरुळी कांचन येथील बायफ संस्थाही करत असल्याने या ठिकाणी भेट दिली. पशुधन विकास महामंडळ व बायफ संस्था एकत्र आल्यास, पुढील काही महिन्यातच वीस लिटर दुध देणाऱ्या गिर गाई आपल्याकडेही शेतकऱ्यांच्या गोठ्यात दिसतील यात काहीही शंका नाही.''

कोरोना गर्दीमध्ये हरवला; लोकांची पर्यटनस्थळांकडे धाव, महामार्ग जॅम!

सानेन जातीची शेळी बद्दल बोलताना केदार म्हणाले, ''बारा लिटरहुन अधिक दुध देणारी सानेन जातीची शेळी सध्या कॅनडा देशात खुपच प्रसिध्द आहे. सानेन जातीची शेळी आपल्या राज्यातील तापमाणाला व वातावरणात टिकणार असल्याचे संशोधनातून पुढे आल्याने, पशुधन विकास महामंडळांच्या माध्यमातून आपल्याही राज्यात सानेन जातीची शेळीचे उत्पादन करण्याबाबत संशोधन सुरु आहे. सानेन जातीच्या शेळीवर बायफ काम करत असल्याने, सानेन शेळीबाबतही बायफची मदत घेतली जाणार आहे. ही शेळी आपल्या राज्यात आल्यास, ग्रामीण भागातील शेतकरी सधन होणार याबाबत कोणतीही शंका नाही. यामुळे गिर गाई बरोबरच सानेन जातीची शेळीही पुढील काही महिण्यातच राज्यात दाखल होणार आहे. दुध उत्पादनबरोबरच, ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था सधन करण्यासाठी पशुधन विकास महामंडळ व बायफ संस्था एकत्र काम करणार आहेत. 

यावेळी आमदार अशोक पवार, पशुधन विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. धनंजय परकाळे, बायफचे अध्यक्ष डॉ. गिरीष सोहनी, वरीष्ठ उपाध्यक्ष अशोक पांडे, व्ही. वाय. देशपांडे, डॉ. जयंत खडसे, डॉ. स्वामीनाथन, कर्नल कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 3rd Test: तुमचा अभिमान! शुभमन गिल पराभवानंतर काय म्हणाला? सामना नेमका कुठे फिरला हे सांगितलं, जसप्रीतबाबत...

Video: सर्वच सीमा ओलांडल्या! फेमस होण्यासाठी बाईकवर जोडप्याचं नको ते कृत्य, लोकांनी व्हिडिओ बनवून व्हायरल केला

IND vs ENG 3rd Test: मोहम्मद सिराज दुर्दैवी पद्धतीने बाद झाला, रवींद्र जडेजा हतबल दिसला; इंग्लंड तिथेच जिंकला Video

Mhada Lottery: मुंबईकरांना म्हाडाकडून आनंदवार्ता! ५ हजारहून अधिक घरांची लॉटरी जाहीर; 'असा' करा अर्ज

ENG vs IND, 3rd Test: जडेजा लढला, पण इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकली! १९३ धावा करतानाही भारताची उडाली भंबेरी

SCROLL FOR NEXT