Girish Bapat
Girish Bapat Sakal
पुणे

Girish Bapat Death : "महिन्याभरापूर्वी गप्पा मारायला ते ऑक्सिजन सिलेंडर घेऊन आले होते"

सकाळ डिजिटल टीम

खासदार गिरीश बापट यांचं आज निधन झालं. ते ७२ वर्षांचे होते, तसंच ते गेल्या काही दिवसांपासून आजारामुळे अंथरुणाला खिळून होते. त्यांची प्राणज्योत मालवल्यानंतर त्यांच्या अनेक सहकाऱ्यांनी, मित्रांनी त्यांच्या आठवणी जागवल्या आहेत.

काँग्रेसचे माजी आमदार उल्हास पवार यांनी बापट यांच्या निधनानंतर त्यांच्या काही आठवणी सांगितल्या आहेत. त्यातली सर्वात ताजी आठवण म्हणजे महिनाभरापूर्वीची आठवण सांगताना पवार यांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. मित्रांशी केवळ गप्पा मारण्यासाठी आजारी अवस्थेतही बापट ऑक्सिजन सिलेंडर सोबत घेऊन आले होते, असंही पवार यांनी सांगितलं.

उल्हास पवार म्हणाले, "आम्ही सगळे मित्र नेहरू स्टेडिअमच्या हिरवळीवर भेटायचो. गप्पा मारायचो. आत्ता साधारण महिन्याभरापूर्वी मला त्यांचा निरोप आला की मी येतो, आपण तिथे भेटूयात. मी म्हटलं आता अशा अवस्थेत ते कसे येणार? पण तुम्हाला आश्चर्य वाटेल, सोबत ते मोठं सिलेंडर घेऊन आणि दोन माणसं घेऊन ते तिथे आले."

यानंतर मात्र उल्हास पवार यांना अश्रू अनावर झाले. ते पुढे म्हणाले,"आमच्याशी अर्धा तास बोलत होता. अत्यंत मनमोकळेपणाने बोलला. तो गाडीत बसताना आणि गाडीतून उतरताना त्याची ती परिस्थिती मला बघवली नाही. दोन चार दिवसांपूर्वी मला वाटलं होतं की त्याला भेटायला जावं. पण पुन्हा विचार आला की आपल्यामुळे त्याला काही इन्फेक्शन व्हायला नको. तो लवकर बरा व्हावा, असं सतत वाटायचं."

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मोठी बातमी! राज्यातल्या शिक्षक, पदवीधर निवडणुका पुढे ढकलल्या; निवडणूक आयोगाचा निर्णय

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार खरेदी; सेन्सेक्स 340 अंकांनी वधारला, कोणते शेअर्स तेजीत?

Samir Choughule: "तुझ्या विना माझे सतत..."; बायकोच्या वाढदिवसानिमत्त समीर चौघुलेंची खास पोस्ट

Delhi Liquor Scam: मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात 'आप' पक्षही आरोपी, ईडीची हायकोर्टात माहिती

Marathi News Live Update: "केंद्र सरकार लोकतंत्र नव्हे 'धनतंत्र' चालवत आहे", जयराम रमेश यांची टीका

SCROLL FOR NEXT