Ajit Pawar  
पुणे

Ajit Pawar : "थोडी माणुसकी राहुद्या..." ; पुण्यातील भाजपच्या बॅनरबाजीवर अजित पवार संतापले!

जगदीश मुळीक यांचा भावी खासदार उल्लेख असलेले बॅनर झळकले

Sandip Kapde

भाजपचे खासदार गिरीश बापट यांचं तीन दिवसांपूर्वी पुण्यामधील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात निधन झालं. त्यांच्या अकाली निधनामुळे पुणे लोकसभा मतदारसंघाची जागा आता रिक्त झाली आहे. त्यामुळे येत्या सहा महिन्यात या रिक्त जागेवर पोटनिवडणूक होणार आहे. यावरून बॅनरबाजी देखी सुरू झाली आहे. 

गिरीश बापट यांना जाऊन अवघे तीन दिवस उलटले नाही तोच या जागेवर इच्छुकांनी दावा सांगण्यास सुरुवात झाली आहे. भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या कार्यकर्त्यांनी पुण्यात बॅनर लावले आहे. त्यावर जगदीश मुळीक यांचा भावी खासदार असा उल्लेख करण्यात आला आहे. यावर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संतापजनक प्रतिक्रिया दिली आहे. 

अजित पवार म्हणाले, मी काल गिरीश बापट यांच्या पत्नीला मुलाला, सुनेला भेटायला गेलो होतो. बापट त्यांच्या अस्थिचे देखील विसर्जन झाले नाही. थोडी माणुसकी राहुद्या, गुडघ्याला बाशिंग बांधायचे काही कारण नाही. १३ ते १४ दिवस दुखवटा पाळण्याची आपल्यात पद्धत आहे. सगळ्यांची त्याचे तारतम्य ठेवले पाहिजे. विरोधी आणि सत्ताधारी पक्षाच्या लोकांनी देखील हे लक्ष ठेवावे. 

एवढी घाई कशाची आहे? गिरीश बापट यांच्या निधनाला तीन दिवस झाले आहेत. माणुसकी देखील एक गोष्ट आहे. महाराष्ट्राला सभ्य राजकीय परंपरा आहे. आतापासूनच निवडणुकीबद्दल बोलायला लागलो तर लोक आमच्याबद्दल काय विचार करतील, असे अजित पवार म्हणाले. 

संजय राऊत धमकी प्रकरणावर अजित पवार म्हणाले, कुणाला धमकी आली असेल तर तक्रार करावी लागेल. सरकारने याची दखल घ्यावी. जे जनतेचे प्रतिनिधित्व करतात त्यांच्याबाबत अशा घटना घडयला नको. अनेकांना धमक्या येतात. शरद पवार, एकनाथ शिंदे, नितीन गडकरी यांना देखील धमक्या आल्या होत्या. पोलीस तपास करतील. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Fifa World Cup 2026 : ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या नावाची फक्त 'हवा'! बलाढ्य पोर्तुगालला ५२ वर्षांनी वर्ल्ड कप खेळणाऱ्या काँगोने रडवले, धक्कादायक निकाल

T20 WC: धक्कादायक! भारताच्या प्रमुख खेळाडूला स्ट्रेचरवरून मैदानाबाहेर नेण्यात आले... सर्व खेळाडू तिच्याभवती जमले, चिंता वाढवणारी घटना

Monsoon Tourism: पावसाने दडी मारताच ताम्हिणी घाट-देवकुंड पर्यटन ठप्प; अंधारबन, खजिना ट्रेकवर शुकशुकाट

Donald Trump: ''नरेंद्र मोदी पंतप्रधान असेपर्यंत भारतावर हल्ला झाला तर..'', डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान अन् जगभरातील नेत्यांच्या भूवया उंचावल्या

‘बी-२’चा ‘जीआर’ महिनाभरात! सोलापुरातील १२५ वर्षे जुन्या चाळींमधील प्रत्येक कुटुंबास मिळणार काही हजारांत जागेची मालकी; आमदार देवेंद्र कोठेंचा यशस्वी पाठपुरावा

SCROLL FOR NEXT