bapat
bapat 
पुणे

साउंड सिस्टिमचाही अतिरेक न करण्याचा पालकमंत्र्यांचा इशारा

सकाळवृत्तसेवा

पुणे : पोलिसांचा विरोध असूनही गणेशोत्सवात रस्त्यांवर कमानी (बॉक्‍स) उभारण्यास पालकमंत्री गिरीश बापट यांच्या बैठकीत परवानगी देण्यात आली. मात्र, त्या किती असाव्यात, त्यांच्या उंचीबाबत पालकमंत्र्यांनी कार्यकर्त्यांच्या बैठकीत "ब्र'ही काढला नाही. परिणामी, कमानींसंदर्भात बंधने नसल्याने कार्यकर्त्यांनाही मोकळीक मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे मात्र उत्सवात दारू पिऊन धुमाकूळ घालणाऱ्या कार्यकर्त्यांना सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची नावे जाहीर करण्याची सूचना बापट यांनी पोलिसांना केली. साउंड सिस्टिमचाही अतिरेक न करण्याचा इशाराही त्यांनी दिला. 
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर बापट यांच्यासमवेत महापालिका प्रशासन, पोलिस अधिकारी आणि गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांची बैठक बुधवारी झाली. अप्पर पोलिस आयुक्त रवींद्र सेनगावकर, महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र निंबाळकर, वाहतूक शाखेचे उपायुक्त तेजस्वी सातपुते यांच्यासह प्रमुख मंडळांचे पदाधिकारी उपस्थित होते. रस्त्यापासून साडेपाच फूट उंचीवर कमानी उभारण्यास पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यावरून गेली काही दिवस चर्चा सुरू आहे. या पार्श्‍वभूमीवर बैठकीत चर्चा झाली, पण ती ढोबळ झाली. त्यामुळे कमानींवरून पोलिस आणि कार्यकर्त्यांमधील गोंधळ कायम राहणार आहे. 

बापट यांनी कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यांच्या तक्रारी पोलिसांपुढे मांडत काही बाबी सोडविल्याही. त्यामुळे बापट कार्यकर्त्यांचीच बाजू लावून धरत असल्याचे बैठकीदरम्यान दिसून येत होते. मात्र, उपद्रवी कार्यकर्त्यांचा मुद्दा स्वतः उपस्थित करीत त्यांना फटकारले. गणेश विसर्जन मिरवणुकीत काही कार्यकर्ते दारू पिऊन धिंगाणा घालत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे उत्सवाला गालबोट लागल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच, कार्यकर्ते आणि पोलिसांमध्येही वाद होतात. या पार्श्‍वभूमीवर बापट यांनी मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना सबुरीचा सल्ला दिला. तेव्हाच त्यांचे कानही टोचले. 

बापट म्हणाले, ""उत्सवाचे पावित्र्य राखले पाहिजे. काही मंडळे उगाचच साउंड सिस्टिम उभारतात. ज्यामुळे सामान्य लोकांना प्रचंड त्रास होतो. अशा प्रकारे मंडळांनी वागू नये. उत्सवासाठी मांडव आणि कमानी उभारण्याबाबत न्यायालयाच्या नियमांचा आदर केला पाहिजे. ज्या मंडळांनी गेल्या वर्षी जेवढा मांडव उभारला होता, तेवढाच यंदाही उभारावा. त्यांना परवानगी दिली जाईल. त्या वेळेत मिळतील. त्यासाठी महापालिका आणि पोलिसांना काही सूचना केल्या आहे. कार्यकर्त्यांना हेलपाटे मारू देणार नाही.'' 
""उत्सवातील गर्दी लक्षात घेता, मंडळांनी सुरक्षिततेच्या उपाययोजना केल्या पाहिजेत. गरजेपुरत्याच किमान कमानी उभाराव्यात. त्यातून वाहतूक खोळंबणार नाही, याची काळजी घ्या,'' असा सल्लाही त्यांनी दिला. कमानी आणि मांडवामुळे वाहतुकीला अडथळा होणार नाही, याची काळजी घेण्याची सूचना कार्यकर्त्यांना केल्याचे मात्र बापट यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

पोलिसांकडून त्रास होऊ नये, कार्यकर्त्यांच्या अडचणी समजून घ्याव्यात, परवानगीसाठी चकरा माराव्या लागतात, मांडव उभारताना पोलिस अडवणूक करीत असल्याची गाऱ्हाणी कार्यकर्त्यांनी मांडली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024 LSG vs KKR Live Score: कोलकाताला तिसरा धक्का! धोकादायक आंद्रे रसेल स्वस्तात बाद

Sharad Pawar : आपण सर्वजण एक आहोत तोपर्यंत कोणी धक्का लावू शकत नाही : शरद पवार

Prakash Ambedkar : पवार व ठाकरे यांची मागच्या दरवाजातून भाजपशी चर्चा; ॲड. प्रकाश आंबेडकर यांचा दावा

Lok Sabha Election 2024 : लोकसभेचा तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला, देशभरातील 94 जागांसाठी 7 मे रोजी मतदान

SCROLL FOR NEXT