पुणे

महापालिकेकडून मुलींचा जन्मोत्सव 

दीपेश सुराणा

पिंपरी - मुलीच्या जन्माचे स्वागत करण्यासाठी महापालिकेतर्फे एक किंवा दोन मुलींनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणारी आई व मुलगी यांच्या संयुक्त नावाने मुदतठेव पावती स्वरूपात अर्थसाह्य दिले जाते. त्याअंतर्गत सध्या ५२ मुदतठेव पावत्यांचे वाटपाचे काम सुरू आहे. तर बाळंतविडा योजनेत गेल्या नऊ महिन्यात एक हजार ४०० मातांना बाळंतविडा दिला आहे.

योजनेमध्ये एका मुलीनंतर कुटुंबनियोजन शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेला २५ हजार, तर दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या महिलेस १० हजार रुपये अर्थसाह्य दिले जाते. गेल्या नऊ महिन्यांत योजनेसाठी ५२ अर्ज असून, एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या पाच, तर दोन मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या ४७ महिलांचा समावेश आहे. त्यांना सध्या मुदतठेव पावती स्वरूपात एकूण एक लाख ७२ हजार रुपयांचे अर्थसाह्य देण्याची कार्यवाही सुरू आहे, अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे-मारणे यांनी दिली.  

गेल्या वर्षी एका मुलीनंतर शस्त्रक्रिया करणाऱ्या चार, दोन मुलींनंतर शस्त्रक्रिया केलेल्या ७६ महिलांना लाभ देण्यात आला. एकूण एक लाख ७६ हजार रुपये अर्थसाह्य दिले.

मुलीचा जन्मोत्सव साजरा करण्याचा मूळ हेतू त्यामागे असून, महापालिका रुग्णालयात जन्मलेल्या पहिल्या व दुसऱ्या मुलीसाठी ही योजना आहे.  
- डॉ. पवन साळवे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी

बाळंतविडा योजना
महापालिका रुग्णालयात जन्म झालेल्या पहिल्या व दुसऱ्या मुलीसाठी मातेला बाळंतविडा योजनेचा फायदा दिला जातो. त्यात १ दिवस ते ६ महिन्यांच्या बालिकेस येतील अशा कपड्यांचा संच असतो. त्यात एक फ्रॉक, दोन झबली, दोन कानटोप्या, सहा लंगोट, दोन दुपटी, प्रत्येकी एक स्वेटर, टोपी, पायमोजे आदींचा समावेश आहे. चालू वर्षी सहा हजार ५०० संचाची खरेदी केली आहे. त्यातील एप्रिल ते डिसेंबरअखेर नऊ महिन्यांत एक हजार ४०० संचांचे वाटप झाले आहे. गेल्या आर्थिक वर्षात चार हजार ५०० बाळंतविडे दिले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंचं ठरलं! मुंबईत नव्हे अंतरवालीतच!! निर्णय का बदलला? अचानक मुंबईत जाण्याची शक्यता

Mumbai News : झेडपीच्या प्रश्नांवर तोडगा; आरोग्य केंद्र आणि निवासस्थानांचा मार्ग मोकळा; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत महत्त्वाचे निर्णय

Marathi News Live Updates : पारोळ्यात रेशनचा माल काळ्याबाजारात विक्रीचा प्रयत्न फसला

Hiwarkhed Accident : पत्रकार किशोर खडे यांचा अपघातात मृत्यू; हिवरखेड-सोनाळा मार्गावर दुचाकींची समोरासमोर धडक

Pune Crime: पुणं हादरलं! डोक्यात हातोडा घालून मित्रांनी काढला मित्राचा काटा; विरोधी पार्टीचं स्टेटस ठेवल्याचा राग

SCROLL FOR NEXT