potholes File Photo 
पुणे

Pune News : खड्ड्यात पडून मुलीच्या मृत्यू; रस्त्याच्या ठेकेदारावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

हा खड्डा रस्ता बनविणाऱ्या ठेकेदाराने खोदला असून सदर खड्यास कोणताही संरक्षक कठडा अथवा इतर कोणतीही संरक्षक उपाययोजना केली नाही.

अशोक गव्हाणे ashokgavhane0404@gmail.com

कोंढवा, ता. ९ : कात्रज-कोंढवा रस्त्यावरील ग्रेडसेपरेटरसाठी (समतल विलघक) खोदलेल्या खड्ड्यात पडून एका मुलीचा मृत्यू शनिवारी (ता. ९) झाला. या प्रकरणी खडीमशिन चौक ते कात्रजकडे जाणाऱ्या रस्त्याच्या ठेकेदारावर कलम ३०४ अ अन्वये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी जगदीश छगन शिलावट (वय ३५) यांनी कोंढवा पोलिसांत फिर्याद दिली आहे.

कात्रज-कोंढवा रस्त्यावरील महाकाली मंदिराजवळील ग्रेडसेपरेटरसाठी खोदलेल्या खड्याला कोणत्याही प्रकारच्या सुरक्षाविषयक बाबीचे पालन न करण्यात आल्यानेच ही घटना घडली असल्याचे कारण देत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर खड्डा रस्ता बनविणाऱ्या ठेकेदाराने खोदला असून सदर खड्यास कोणताही संरक्षक कठडा अथवा इतर कोणतीही संरक्षक उपाययोजना केली नाही. ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळेच सदर खोदलेल्या खड्यात पावसाच्या साचलेल्या पाण्यात बडून मुस्कान शिलावट (वय १६) या मुलीचा मृत्यू झाला आहे. त्यानुसार मुलीच्या नातेवाईंकाच्या फिर्यादीनुसार त्या पद्धतीने गुन्हा नोंद केला असल्याची माहिती कोंढवा पोलिसांनी दिली. याबाबतचा पुढील अधिक तपास पोलिस निरिक्षक मानसिंग पाटील करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Mumbai Trains: प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! १७ जुलैपर्यंत पुणे-मुंबई २५ गाड्यांचे मार्ग बदलले, दौंड-मनमाड मार्गे गाड्या वळवल्या..

Maharashtra land Acquisition: भूसंपादन प्रक्रियेला गती देण्यासाठी राज्याचा मोठा निर्णय; १०३ विशेष भूसंपादन अधिकारी पदांची पुनर्रचना, प्रकल्पांना मिळणार वेग

Latest Marathi News Live Update : लाडकी बहीण योजनेतून 90 लाखांपेक्षा जास्त महिलांची नावे वगळली; सर्वाधिक संख्या बीड जिल्ह्यातील

Kolhapur Monsoon Rainfall : धरण क्षेत्रांत 41 दिवसांत 36 वेळा अतिवृष्टी; सर्वाधिक पाटगाव क्षेत्रात, सर्फनालामध्ये 24 तासांत 347 मिमी.ची नोंद

उत्तम गुंतवणूक : एलेनबारी इंडस्ट्रियल गॅसेस (शुक्रवारचा बंद भाव : रु. २९४.२५)

SCROLL FOR NEXT