Katraj Kondhwa road Mahakali Temple Pune esakal
पुणे

Pune : कात्रज-कोंढवा मार्गावर रस्त्याच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यात पडून मुलीचा मृत्यू; तीन मुलींना वाचवण्यात यश

खड्ड्यामध्ये पाय घसरून मुली पडल्यायाची माहिती प्रत्यक्षदर्शिनी अग्निशमन दलला व पोलिसांना दिली.

सकाळ डिजिटल टीम

अग्निशामक दलाच्या जवानांनी चौथ्या मुलीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांकडून तिला मृत घोषित करण्यात आले.

कोंढवा : कात्रज-कोंढवा रस्ता (Katraj-Kondhwa Road) रुंदीकरणाच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यातील पाण्यात चार मुली पडल्याची घटना शनिवारी (ता. ८) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली. गगन उन्नती सोसायटीसमोर महाकाली मंदिराजवळ (Mahakali Temple) असणाऱ्या १५ फूट खड्ड्यामध्ये पावसाचे पाणी साचलेले आहे. या खड्ड्यात मुली कपडे धुण्यासाठी गेल्या असता पडल्या.

पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-कोंढवा रस्त्याचे काम सुरू असून त्या ठिकाणी महाकाली मंदिराजवळ काही लोक तातपूरत्या स्वरूपाच्या झोपड्या टाकून राहतात. त्यामुळे शेजारी असणाऱ्या पाण्याच्या खड्ड्यात येथील महिला व मुली कपडे धुण्यासाठी जात असतात. कपडे धुण्यासाठी गेले असता, खड्ड्यामध्ये पाय घसरून मुली पडल्यायाची माहिती प्रत्यक्षदर्शिनी अग्निशमन दलला व पोलिसांना दिली.

तोपर्यंत स्थानिकांनी तीन मुलींना बाहेर काढले होते. मात्र, एका मुलीला वाचविण्यात अपयश आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी चौथ्या मुलीला बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले असून डॉक्टरांकडून तिला मृत घोषित करण्यात आले. पुढील तपास कोंढवा पोलिस करत आहेत.

सरगम शिळावत (वय १५), सेजल शिळावत (वय १३), जानू शिळावत (वय १५) अशी पाण्यातून बाहेर काढलेल्या तर मुस्कान शिळावत (वय १६) असे मृत मुलीचे नाव आहे. कोंढवा अग्निशामक दलाकडून ड्रायव्हर समीर तडवी, तांडेल दशरथ माळवदकर, फायरमन प्रकाश शेलार, अभिजीत थळकर, विश्वजीत वाघ यांनी मुलीचे शोधकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supreme Court : “केवळ पोटनिवडणुकाच तर आहेत”; एसआयआरवर तातडीच्या सुनावणीस CJI सूर्यकांत यांचा नकार, ३८ लाख मतदारांची चिंता

“शंका असेल तर पुढच्या वर्षी या…” कलाकारांच्या ढोलवादनावर प्रश्न विचारणाऱ्या विद्याधर जोशींना श्रुती मराठेचं उत्तर; अभिजीत केळकरही संतापला!

Petrol-Diesel-CNG Price: कच्च्या तेलाचे भाव भडकले! हैदराबादमध्ये पेट्रोल ₹116 वर; महाराष्ट्रात पेट्रोल-डिझेलचा ताजा भाव किती?

Marathi News Live Updates: टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांचे वर्षभरापासून एक कोटी रुपये थकीत; संतप्त शेतकऱ्यांनी बाजार समितीच्या कार्यालयाला ठोकले टाळे

Miraj Road Accident : वडगाव-हातकणंगले रस्त्यावर दुचाकी-कारचा भीषण अपघात! सांगलीतील बँक शाखा व्यवस्थापक जागीच ठार; पत्नीच्या डोक्याला गंभीर दुखापत

SCROLL FOR NEXT