girl drowned in water of neera river near bhatghar dam pune Crime News  
पुणे

Pune News : पाय निसटला अन्... मित्रासोबत भाटघर धरण परिसरात फिरायला गेलेल्या तरुणीवर काळाचा घाला

रोहित कणसे

पुणे शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील भाटघर धरण परिसरात तरुणासोबत फिरायला गेलेल्या तरुणीवर काळाने घाला घातला आहे. नीरा नदीच्या किनाऱ्यावर बसलेल्या तरुणीचा अचानक तोल जाऊन ती पाण्यात पडली आणि प्रवाहासोबत वाहून गेली.

दरम्यान या मुलीसोबत असलेल्या तरुणाने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला, पण तो तिला वाचवू शकला नाही. यानंतर संबंधीत तरुणाने भोर पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना याबद्दलची माहिती दिली. साम टीव्हीने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. यानंतर पोलिस, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आणि सह्याद्री रेस्क्यू फोर्सचे जवान तरुणीच्या मृतदेहाचा शोध घेत आहेत. सोमवारी (ता.३) सायंकाळी पाचच्या सुमारास ही घडली.

सायंकाळी निगुडघर (ता.भोर) येथील तरुण आणि संबंधीत तरुणी हे दोघे भाटघर धरणाजवळ फिरण्यासाठी आले होते. धरणाच्या भिंतीच्या खालच्या बाजूला पॉवर हाऊसच्या जवळ नदीच्या कडेला पाण्यात पाय सोडून दोघेही बसले होते, अशी माहिती भोर पोलिसांनी माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atrocities Act: ‘ॲट्रॉसिटी’अंतर्गत दोषसिद्धीचे प्रमाण वाढवा: मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश, अधिक गुन्ह्यांच्या जिल्ह्यांत जलदगती न्यायालये उभारा

Crime News: दोन महिन्यांआधी प्रेमविवाह; सासरी येताच नवविवाहित तरुणी १४ वर्षीय दिरासोबत पळाली, कुटुंबीयांचा गंभीर आरोप

Gujarat ATS: गुजरातमध्ये जैशचा कट उधळला! एटीएसकडून आठ संशयित दहशतवाद्यांना अटक; मॉड्यूल उभारण्याचा संशय

सहजिल्हा निबंधकाला १० हजाराची लाच घेताना पकडलं, घरी छापा टाकताच सापडलं मोठं घबाड; कोट्यवधीचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: लोहगड खूनप्रकरणात नवे धागेदोरे! आरोपी चेतनच्या मित्रांची कसून चौकशी; सिया-चेतन न्यायालयीन कोठडीत

SCROLL FOR NEXT