Pune Crime : अल्पवयीन मुलीचा छळ; आरोपीला एक तासात केली अटक  sakal media
पुणे

Pune Crime : अल्पवयीन मुलीचा छळ; आरोपीला एक तासात केली अटक

कोंढवा पोलिसांची कामगिरी; सूत्रांच्या माहितीनुसार कोंढव्यातील लुल्लानगर चौकात केली कारवाई

सकाळ वृत्तसेवा

कन्टोन्मेट : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला एका तासात जेरबंद केले. कोंढवा पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि सूत्रांच्या माहितीआधारे आरोपीचा शोध घेत सापळा रचून कारवाई केली. नथुराम काळू शिंदे (वय ५४, रा. रास अपार्टमेंट, संतोषनगर, नवग्रह शनिमंदिरसमोर, कात्रज) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले की, फिर्यादीच्या अल्पवयीन मुलीचा छळ केल्याप्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू होता. त्यावेळी गुन्ह्यातील आरोपी पळून जाण्याच्या तयार असल्याची पोलिसांना आरोपीची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी लुल्लानगर चौक, कोंढवा खुर्द येथे उड्डाण पुलावर सापळा रचून ताब्यात घेऊन अटक केली.

कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल होता. त्याअनुषंगाने पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर, पोलीस निरीक्षक गोकुळ राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक स्वप्नील पाटील, पोलीस हवालदार गरूड, पोलीस नाईक जोतिबा पवार, तुषार आल्हाट, गोरखनाथ चिनके, निलेश देसाई, सतिष चव्हाण, लक्ष्मण होळकर, किशोर वळे यांच्या पथकाने ही कामगिरी केली. पुढील तपास पोलीस निरीक्षक जगन्नाथ जानकर करीत आहेत. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी कोंढवा पोलीस ठाण्यातील सर्व पथकांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भारतात नवं संकट, काळजी घ्या! PM मोदींकडून देशवासियांना महत्त्वाचं आवाहन

Hasan Mushrif Statement : अर्थ खाते लवकरच राष्ट्रवादीला मिळणार? सुनिल तटकरे छगन भुजबळ वादावर हसन मुश्रीफांनी केलं वक्तव्य

'बॉलिवूडमध्ये मराठी कलाकरांना घाटी म्हणतात' वैभव मांगले हिंदी सिनेसृष्टीबद्दल स्पष्टच बोलले... म्हणाले...

Latest Marathi News Live Update : NEET पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट; ‘त्या’ दोन विद्यार्थ्यांचीही CBI चौकशी

farmer Loan Relief: कर्जमाफीच्या निकषांकडे शेतकऱ्यांचे डोळे; ३० जूनपूर्वी जाहीर करण्याचा सरकारचा मानस, काय असतील संभाव्य निकष?

SCROLL FOR NEXT