Cyber Crime
Cyber Crime 
पुणे

मुली-महिलांचा सायबर छळ

प्रियांका तुपे

पुणे - बदला घेण्याच्या प्रवृत्तीतून महिलांवर होणारे सायबर अत्याचार, तसेच ऑनलाइन बदनामीच्या गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशा प्रकारांतून अनेक पीडित महिला आत्महत्येचा मार्ग अवलंबत आहेत. दर १० महिलांपैकी एक महिला अशा गुन्ह्यांना सामोरे जात आहे, असे चित्र सायबर अँड लॉ फाउंडेशन या संस्थेच्या सर्वेक्षणातून पुढे आले आहे. 

अशा गुन्ह्याचा आरोप असलेला अक्षय राव (वय २७, रा. नाशिक) या आयटी अभियंत्याचा जामीन मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच फेटाळला. या तरुणाने त्याच्या मैत्रिणीवर लैंगिक अत्याचार करून त्याचे चित्रीकरण केले. ते व्हिडिओ वेगवेगळ्या पोर्नोग्राफिक वेबसाइट्‌सवर अपलोड केले, असा आरोप त्याच्यावर आहे. तब्बल पाच वेळा सत्र व उच्च न्यायालयाने या आरोपीला जामीन नाकारला असून, हा आरोपी मागील १६ महिन्यांपासून तुरुंगात आहे. ॲड. प्रशांत माळी यांनी या प्रकरणात आरोपीचा जामीन नामंजूर होण्यासाठी पीडित मुलीच्या बाजूने खटल्यासाठी मोफत कामकाज केले. 

सोशल मीडियावरून जे पुरुष महिलांशी संवाद साधतात, त्यांच्यावर विश्‍वास ठेवण्याआधी महिलांनी त्यांच्या माहितीबाबत खात्री करून घेतली पाहिजे. 
- जयराम पायगुडे, पोलिस निरीक्षक, सायबर विभाग

एखाद्या मुलीने शरीरसंबंधास नकार दिल्यानंतर तिचा मोबाईल नंबर सोशल मीडियावर व्हायरल करण्याचे प्रकार घडतात. त्यामुळे महिलांचे मानसिक खच्चीकरण होते. त्यासाठी समुपदेशन व इतर आरोग्य सुविधा पुरवणारी व्यवस्था हवी. 
- मुक्ता चैतन्य, सोशल मीडिया ॲनलिस्ट

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : भारतातील निवडणूक प्रक्रिया पाहण्यासाठी आले 23 देशांमधील पाहुणे

ISL vs IPL : पीसीबी घेणार मोठा पंगा; आयपीएल अन् पीएसएलमध्ये होणार टक्कर

IPL 2024 PBKS vs CSK Live Score : ऋतुराजने पुन्हा नाणेफेक गमावली; पंजाबने घेतला गोलंदाजीचा निर्णय

Sushilkumar Shinde : पंतप्रधान नरेंद्र मोदींना सत्तेची चटक;ही निवडणूक हुकूमशाही विरुद्ध लोकशाहीची

Prasad Khandekar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम प्रसाद खांडेकरच्या वाढदिवसानिमित्त नम्रता संभेरावची खास पोस्ट; दहा वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करत म्हणाली...

SCROLL FOR NEXT