पुणे

गर्लफ्रेंड गेली रिक्षावाल्यासोबत पळून; आसिफने घेतला असा बदला की, पोलिसही झाले आवाक्

सकाळवृत्तसेवा

पुणे : मोबाईल चोरी प्रकरणी एका तरुणाला पोलिसांनी अटक केली असून चोरी करण्याचे कारण सांगितल्यानंतर पोलिस देखील चक्रावले आहे. प्रेयसीने रिक्षाचालकासोबत पळून जाऊन लग्न केल्याने सर्व रिक्षाचालकांचा बदला घेण्यासाठी मी फक्त रिक्षाचालकांचे मोबाईल चोरात, अशी कबुली या तरुणाने पोलिसांना दिली आहे.

आसिफ उर्फ भूराभाई अरिफ शेख (रा. कोंढवा) असे या तरुणाचे नाव आहे. आसिफ कात्रज, कोंढवा, कॅम्प अशा परिसरात नियमित रिक्षाने प्रवास करायचा. रिक्षा गर्दीच्या ठिकाणी  थांबवल्यावर आपला मोबाइल खराब असल्याचे सांगत तो मित्राला फोन करण्यासाठी रिक्षाचालकाकडे मोबाइल मागायचा. त्यानंतर फोनवर बोलण्याचा बहाणा करत रिक्षापासून काही अंतर चालत जाऊन पळून जायचा.

प्रियसीने रिक्षाचालकासोबत लग्न केल्याचे समजलं आणि...: 
आसिफ हा मूळचा अहमदाबादमधील आहे.  प्रेयसीसोबत लग्न करण्यास त्याच्या घरच्यांचा विरोध होता. त्यामुळे त्याने अहमदाबादमधील स्वतःचे रेस्टॉरंट विकले आणि गेल्या वर्षी जून महिन्यात प्रेयसीसोबत लग्न करण्यासाठी पुण्यामध्ये पळून आला. प्रेयसीसोबत लग्न करुन पुण्यात नवीन व्यवसाय व जीवन सुरू करण्याचे त्याचे नियोजन होते. पण पुण्यात आल्यावर दोन दिवसांमध्येच त्याची प्रियसी आसिफकडील पैसे व सामान चोरून गुजरातला पळून गेली. तिचा शोध घेत आसिफ गुजरातला पोहोचला. तेथे गेल्यानंतर तिने एका रिक्षाचालकासोबत लग्न केल्याचं त्याला समजले. त्यामुळे त्याला मोठा धक्का बसला. आसिफ पुन्हा पुण्याला आला आणि कोंढव्यात राहणाऱ्या त्याच्या एका नातेवाईकासह काम करण्यास सुरुवात केली. पण या प्रकरणामुळे त्याच्या मनात रिक्षाचालकांबाबत राग निर्माण झाली होता. त्यामुळे रिक्षाचालकांना धडा शिकवण्यासाठी त्याने त्यांचे मोबाईल चोरायला सुरूवात केली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सुमारे 70 मोबाईल चोरले : 
मोबाइल चोरून पसार झाल्यानंतर कोणाच्या हाती लागत नसल्याने आसिफची हिम्मत वाढतच गेली. आतापर्यंत त्याने शहरातील 70 पेक्षा जास्त रिक्षाचालकांचे मोबाईल चोरल्याचे चौकशीत समोर आले आहे, अशी माहिती कॅटॉन्मेंट पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक चंद्रकांत भोसले यांनी दिली. आसिफला न्यायालयात हजर केले असता त्याची 27 ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडीत त्याची रवानगी करण्यात आली आहे. त्याच्याकडून आतापर्यंत 12 मोबाइल हस्तगत करण्यात आले आहेत.

(Edited by : Sagar Diliprao Shelar)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maratha Reservation: मनाेज जरांगेंचा मोठा निर्णय? १८व्या दिवशी मुंबईकडे निघण्याची तयारी; उपोषणस्थळी समर्थकांची गर्दी

Saundatti Dharwad Road Accident : बेळगावसाठी काळा दिवस! १५ तासांत ७ जणांचा मृत्यू; सौदत्ती-धारवाड मार्गावर भीषण अपघातात तीन मित्र जागीच ठार

Mumbai-Goa Highway Chemical Leak : मुंबई-गोवा महामार्गावर पुगाव हद्दीत ज्वलनशील रसायन वाहून नेणाऱ्या कंटेनरला अपघात; सर्व यंत्रणांच्या सतर्कतेमुळे गणेशोत्सवातील भीषण दुर्घटना टळली

Latest Marathi News Update : मनोज जरांगे पाटील ११ वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईचे दिशेने रवाना होणार

टीम इंडियाने करंडक जिंकला, नक्वींच्या हातून ट्रॉफीही घेतली नाही; आता ACC अध्यक्षांच्या खुर्चीवर टांगती तलवार, पुन्हा निवड होणार का?

SCROLL FOR NEXT