विमान प्रदर्शन पाहण्यात रमलेली मुले sakal
पुणे

एनडीए प्रवेशाच्या संधीचा लाभ मुलींनी घ्यावा - मार्शल गोखले

संगणक प्रणाली व ड्रोन च्या क्षेत्रात मुली चांगल्या काम करु

सकाळ वृत्तसेवा

कोथरूड : मुलींसाठी एनडीएचे दरवाजे खुले झाले असून मुलींनी या संधीचा फायदा घ्यावा. संगणक प्रणाली व ड्रोन च्या क्षेत्रात मुली चांगल्या काम करु शकतात. असे मत निवृत्त एअर मार्शल भूषण गोखले यांनी व्यक्त केले. भारतीय जनता युवा मोर्चा यांच्यावतीने माजी राष्ट्रपती ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंती निमित्त महेश विद्यालय प्रांगणात आयोजित "सफर विमानांची सफर हवाई दुनीयेची" या प्रदर्शानाचे उद्घाटन गोखले व महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी गोखले बोलत होते.

यांनी भारतरत्न डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या पावलावर पाउल ठेवीत आजच्या पिढीने भारताच्या सरक्षंण क्षेत्रात कामगिरी करावी यासाठीच हे प्रदर्शन ठेवण्यात आले आहे असे आवर्जून नमूद केले गोखले म्हणाले की, भारतीय हवाई दल, सैन्य दला मध्ये भरती होण्यासाठी आतापासुन व्यायाम करण्यावर भर द्या. व्यावसायिक प्रशिक्षण घेऊन परिक्षांची तयारी करा. यशस्वी होण्यासाठी मानसिक दृष्ट्या सक्षम असणे गरजेचे असून कोणत्याही प्रकारच न्यूनगंड मनामध्ये बाळगु नये. युध्दाच्या वेळी हार आणि जित असते तिथे प्रथम किंवा द्वितीय क्रमांक नसतो त्यामुळे भविष्यात आपण विद्यार्थ्यानी अशी कामगिरी करावी ज्यामुळे आपल्या देशाचा विजयच झाला पाहीजे. मिसाईल क्षेत्रात भारताची कामगिरी दमदार आहे. आपला देश एके दिवशी शस्त्रास्त्रे, लढाउ विमानांच्या बाबतीत आत्मनिर्भर झालेला आपल्या दिसेल. संयोजक कोथरूड भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष दुष्यंत मोहोळ यांनी स्वागत व प्रास्तविक केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan Semi Final Scenario: पाकिस्तान 'उपकारा'वर जगणार, एका जागेसाठी तिघांमध्ये स्पर्धा रंगणार! जाणून घ्या मजेशीर समीकरण

Pune Metro : हिंजवडी-शिवाजीनगर मेट्रो एप्रिलअखेर धावण्याची शक्यता, पण स्थानकांची कामे अपूर्णच

अल्पवयीन मुलाच्या हाती वाहन, वडिलास भरावा लागेल १०,००० दंड! सोलापूर शहरात बेशिस्त वाहनचालकांवर ‘सिग्नल’च्या ठिकाणी पण कारवाई; १४ मार्चला लोकअदालत

President Droupadi Murmu Shegaon Visit : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगावात होणार आगमन; तीन हजार पोलिसांचा तगडा बंदोबस्त तैनात

PAK vs ENG, T20 WC: हॅरी ब्रूकचे विश्वविक्रमी शतक, इंग्लंड उपांत्य फेरीत! पाकिस्तान वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर? पाकड्यांची रडारड...

SCROLL FOR NEXT