पुणे

गिरवी ते तुळजापूर पायी वारीचे ११ वे वर्ष १२ ऑक्टोबरपासून वारीला प्रारंभ; २० ऑक्टोबरला तुळजाभवानी देवीच्या अभिषेकाने सांगता

CD

गिरवी-तुळजापूर पायी वारीस सोमवारी प्रस्थान

दुधेबावी, ता. ५ : गिरवी ते तुळजापूर पायी वारीचे यंदा ११ वे वर्ष असून, १२ ते २० ऑक्टोबरदरम्यान ही पायी वारी आयोजित केली आहे. गिरवी येथून शेकडो वारकरी तुळजापूरकडे प्रस्थान करतील.

गिरवीकर वारकरी मंडळातर्फे दरवर्षी या पायी वारीचे आयोजन केले जाते. यंदाही भक्तिमय वातावरणात वारीचे नियोजन केले आहे. वारीदरम्यान वारकऱ्यांसाठी विविध ठिकाणी न्याहारी, मुक्कामाची व्यवस्था केली आहे. वारीचा मार्ग व मुक्काम असा : १२ तारखेला गिरवी ते राजुरी पाटी, १३ ला राजुरी पाटी ते सदाशिवनगर, १४ ला सदाशिवनगर ते वेळापूर, १५ ला वेळापूर ते पंढरपूर, १६ ला पंढरपूर ते पोखरापूर, १७ ला पोखरापूर ते वडाळा, १८ ला वडाळा ते सुरतगाव, तर १९ तारखेला सुरतगाव ते तुळजापूर असा वारीचा प्रवास राहील. २० ऑक्टोबरला दुपारी १२ वाजता तुळजापूर येथे देवीची भोगी व अभिषेक होईल. घट उठल्यानंतर होमहवन करून वारीची सांगता करण्यात येणार आहे.
वारीत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांनी विजय कदम, सचिन कदम व रोहित कदम यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
..................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढे पुन्हा चर्चेत ! 'एफडीए'च्या मोहिमेची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल; मुंबईतील कारवाईची जगभर होतेय चर्चा

उल्हासनगरच्या वादाचे पडसाद कल्याण-डोंबिवलीत! महायुतीतील धुसफूस पुन्हा उघड; भाजप नगरसेवकाची कमलेश निकम यांच्यावर टीका

'सुनो सुनो सेन्योरिटा कहते हैं हम क्या' अमृता खानविलकर, नेहा पेंडसेसह सोनालीचा भन्नाट डान्स, Video Viral

Ratnagiri Tourist Rush : मुंबई-पुणेकरांची कोकणाला पसंती; 'लाँग वीकेंड'मुळे गणपतीपुळेत 3 दिवसात 65 हजार पर्यटक, कोटीच्या घरात उलाढाल

Latest Marathi News Live Update : नागपूर पदवीधर मतदारसंघात राजकीय समीकरणे बदलली; वंजारी, कोहळे यांच्यासह कराळे-सोलेही मैदानात?

SCROLL FOR NEXT