SUpriya-Sule 
पुणे

अंगणवाडी सेविकांना हेल्थ कार्ड द्या - सुप्रिया सुळे

सकाळवृत्तसेवा

पुणे - जिल्ह्यातील अंगणवाडी पर्यवेक्षिका, सेविका आणि मदतनिसांना जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत हेल्थ कार्ड देण्याची सूचना खासदार सुप्रिया सुळे यांनी पुणे जिल्हा परिषद प्रशासनाला केली आहे. तसेच, येत्या सहा महिन्यांत याबाबत अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. 

अंगणवाड्या आणि सेविकांच्या समस्या जाणून घेऊन त्यावर उपाययोजना करण्यासाठी सुळे यांनी जिल्हा परिषदेत आढावा बैठक घेतली, त्या वेळी त्यांनी ही सूचना केली. या प्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजित शिवतरे, महिला व बालकल्याण सभापती पूजा पारगे, समाजकल्याण सभापती सारिका पानसरे, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रेय मुंडे, संदीप कोहिनकर, राष्ट्रवादी काँग्रेस महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित होते.

अंगणवाडी सेविकांच्या आरोग्याची तपासणी होणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी हेल्थ कार्ड करून द्यावे. वर्षातून एकदा तपासणी होणे आवश्‍यक आहे. जिल्हा कुपोषणमुक्त करणे, गर्भवतींसाठी विशेष मोहीम आखणे, अंगणवाड्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करणे आदीबाबत सुळे यांनी सूचना केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Minor Girl Acid Attack: शाळेतून घरी निघालेल्या अल्पवयीन मुलीवर अ‍ॅसिड हल्ला; अहिल्यानगर हादरलं, नराधम फरार

Multibagger Stock: एका आठवड्यात शेअर 24% वाढला! 1 रूपयाच्या या शेअरने 5 वर्षात 1 लाखाचे 10 लाख केले

World Cup 2027 खेळण्यासाठी चुरस वाढली! १० जागांसाठी मोठमोठ्या संघांमध्येही मारामारी

Latest Marathi News Live Update : सिंहगड रस्त्यावरील तरुणाच्या खून प्रकरणी तीन अल्पवयीन ताब्यात

मराठी कलाविश्वाचा सन्मान सोहळा… दिमाखात रंगला ‘चिरायू २०२६’; राबवली ‘बीज गुढी’ची अनोखी संकल्पना

SCROLL FOR NEXT