पुणे

गरज असेल तरच रेमडेसिव्हिर द्या; पुणे जिल्हा प्रशासनाच्या सूचना

अनिल सावळे -@AnilSawale

पुणे : कोरोनाबाधित असूनही कोणतीही लक्षणे नाहीत किंवा दहापेक्षा जास्त दिवसांपासून कोरोनाची लक्षणे आहेत. तसेच, सौम्य आजार आहे अवयव निकामी झालेले असतील किंवा रेमडेसिव्हिरची एलर्जी आहे, अशा रुग्णांसाठी रेमडेसिव्हिर इंजेक्शनचा वापर करू नये, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत. रेमडेसिव्हिरची गरज असलेल्या रुग्णांनाच ते उपलब्ध व्हावे, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

रेमडेसिव्हिरचा काळाबाजार रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने खासगी रुग्णालयांमार्फतच रेमडेसिव्हिर देण्याचा निर्णय घेतला. परंतु खासगी रुग्णालयांनी त्याचा वापर कोणत्या रुग्णांसाठी करायचा, यावर जिल्हा प्रशासनाला नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही. संबंधित रुग्णालयांकडे ही जबाबदारी देण्यात आली आहे. परंतु काही रुग्णालयांकडून रुग्णांना हे इंजेक्शन देण्यात गैरप्रकार होत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. तसेच, सध्या रेमडेसिव्हिरची मागणी आणि पुरवठा यामध्ये तफावत वाढत चालली आहे. खासगी रुग्णालयांमधील बेड्‌सच्या सुमारे ५० ते ६० टक्के हे इंजेक्शन उपलब्ध करून देण्यात येत होते. परंतु काही दिवसांपासून औषधी कंपन्यांकडून होणाऱ्या पुरवठ्यात घट होत आहे. या पार्श्वभूमीवरआता खासगी रुग्णालयांनी कोणत्या रुग्णांसाठी प्राधान्याने या इंजेक्शनचा वापर करावा, याबाबत जिल्हा प्रशासनाने मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत.

ही लक्षणे असतील तरच द्या रेमडेसिव्हिर...

  • रुग्णाला सलग तीन दिवसांपेक्षा अधिक दिवस ताप

  • ऑक्सिजनची पातळी ९२ पेक्षा कमी होणे

  • क्ष-किरण अहवालामध्ये न्यूमोनिया आढळणे

  • रक्तातील सायटोकाइन मार्कर्समध्ये तीनपट वाढ होणे

  • छातीचा एचआरसीटी स्कोर ९ पेक्षा जास्त

प्रिस्क्रिप्शन दिल्यास पुरवठा बंद :

रुग्णांच्या नातेवाइकांना रेमडेसिव्हिर बाहेरून विकत आणण्यासाठी प्रिस्क्रिप्शन देण्यात येत आहे. हे इंजक्शन सध्या खुल्या बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाइकांची धावपळ होत आहे. कोणत्याही रुग्णालयांनी रेमडेसिव्हिरसाठी प्रिस्क्रिप्शन दिल्यास त्यांचा पुरवठा बंद करण्यात येइल, असा इशारा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिला आहे.

१० मे रोजी रेमडेसिव्हिर वितरण : (पुणे जिल्हा)

  • खासगी कोविड रुग्णालये : ६२३

  • ऑक्सिजन युक्त आणि आयसीयू बेड॒स : १६ हजार २१७

  • रेमडेसिव्हिर वितरण : ७ हजार ७४०

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI: शुभमन गिलच्या कॅप्टन्सीबद्दल विराट कोहलीने स्पष्टच सांगितलं, 'अजूनही शिकतोय, तो दीर्घकाळ...'

NEET 2026: 'स्लो लर्नर' ते ऑल इंडिया रँक 1; सोडवले 10 हजारांपेक्षा जास्त MCQ! पाहा NEET PG टॉपरची भन्नाट यशोगाथा...

होमस्टेमध्ये २२ वर्षीय निमिषाचा मध्यरात्री मृत्यू, बॉयफ्रेंड आसिफला पोलिसांनी घेतलं ताब्यात

Latest Marathi News Live Update : भंडाऱ्यात खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजीवर कारवाई

Mumbai-Pune Accident: मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर तिहेरी अपघात; कोल्हापुरच्या दोन तरुणांचा मृत्यू, एक गंभीर Video Viral

SCROLL FOR NEXT