milk 
पुणे

दुधाला प्रतिलिटर दहा रुपयांचे अनुदान द्या; महायुतीची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी 

सकाळवृत्तसेवा

पुणे - पुणे जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांचे लॉकडाउनमुळे अतोनात नुकसान झाले आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना प्रतिलिटर 10 रुपयांचे थेट अनुदान द्यावे, अशी मागणी पुणे शहर व जिल्ह्यातील महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी आज (ता. 20) जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांच्याकडे केली. 

या मागणीची पूर्तता येत्या 31 जुलैपर्यंत करण्यात यावी. अन्यथा 1 ऑगष्टला राज्यव्यापी आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. 
खासदार गिरीश बापट, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्यासह महायुतीतील विविध घटक पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

यावेळी भाजपचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, आरपीआयचे (ए) शहराध्यक्ष अशोक शिरोळे, प्रदेश सचिव बाळासाहेब जानराव, शिवसंग्रामचे शहराध्यक्ष भरत लगड, रासपचे शहराध्यक्ष सनी रायकर, शहर भाजपचे सरचिटणीस राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, आरपीआय पश्‍चिम महाराष्ट्र युवक आघाडीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर आदी उपस्थित होते. 

बापट म्हणाले, ""कोरोनाच्या संकटामुळे दूध संकलन होत नसल्याने दूध उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांना दुधाचा योग्य तो भाव मिळत नाही. यामुळे राज्यभरातील दूध उत्पादकांवर अन्याय होत आहे.'' 

(Edited by : Kalyan Bhalerao)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI Tax: यूपीआय टॅक्स मागे घेण्याचं राहुल गांधींचं आवाहन; इंदिरा गांधींचा दाखला देत पंतप्रधान मोदींवर घणाघात

HOROSCOPE: वयाची 50 ओलांडली तरी दिसतात तरुण! ‘या’ 6 राशींच्या लोकांचं व्यक्तिमत्त्व आणि आत्मविश्वास असतो जबरदस्त; तुमची रास कोणती?

ICC Rankings : अभिषेक शर्माने पाकिस्तानी फलंदाजाला लोळवले! Ishan Kishan ने त्याचे अव्वल स्थान कायम राखले

Hingoli News : दुष्काळाच्या झळांनी खरीप करपला; शेतकऱ्यांना मदतीची आस! मानसपिंप्रीत पालकमंत्री नरहरी झिरवाळांकडून नुकसानीची पाहणी, एकरी ५० हजारांची मदतीची मागणी

Marathi News Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन दगडूशेठच्या दर्शनाला

SCROLL FOR NEXT