पुणे

हिमनदी कोसळल्यामुळे नेपाळमध्ये महापूर शास्त्रज्ञांच्या अभ्यासातील माहिती, हवामान बदलाच्या धोक्यांकडे वेधले लक्ष

CD

काठमांडू, लंडन ता. २७ (वृत्तसंस्था) ः हिमनदीचा एक मोठा तुकडा कोसळल्यामुळे नेपाळ-तिबेट सीमेवर अचानक महापूर आल्याचे प्राथमिक माहितीतून स्पष्ट होत आहे. या घटनेमुळे हिमालयातील झपाट्याने वितळणाऱ्या बर्फाचा प्रश्न पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
तिबेटमध्ये काल सकाळी भूकंप झाला, त्यानंतर दरडी कोसळल्या आणि त्यामुळे महापूर आला अशी प्राथमिक माहिती कालपासून सांगितली जात होती. परंतु, हिमनदीचा मोठा तुकडा कोसळल्यामुळे (ग्लेशियल कोलॅप्स) ही आपत्ती आल्याचे अमेरिकेच्या जिऑलॉजिकल सर्व्हेचे (यूएसजीएस) म्हणणे आहे.
हिमनदीचा मोठा तुकडा प्रचंड तीव्रतेने दरीमध्ये आदळला. एखाद्या ५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाएवढी त्याची तीव्रता होती, असे ‘यूएसजीएस’चे म्हणणे आहे.
डंडी विद्यापीठातील हिमनदी तज्ज्ञ डॉ. सायमन कुक `बीबीसी` या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाले, ``त्यांच्या टीमला नेपाळमधील लांगटांग लिरुंग शिखराजवळील (जे पुराच्या ठिकाणापासून पश्चिमेला सुमारे १५ किलोमीटरवर आहे) हिमनदीचा खालचा भाग कोसळल्याचे आढळले आहे.``
त्यांच्या अंदाजानुसार, ही हिमनदी वायव्य दिशेला कोसळली आणि त्यानंतर पश्चिमेकडे प्रवाहाच्या दिशेने वाहत गेली. अलीकडच्या काळात भारत, स्वित्झर्लंड आणि इटलीमध्येही हिमनदी कोसळल्यामुळे पूर आणि दरडी कोसळण्याच्या अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत, असे डॉ. कुक यांचे निरीक्षण आहे.
‘‘कुठलीही एक घटना हवामान बदलामुळेच घडली आहे हे निश्चितपणे सांगणे कठीण असले तरी, जेव्हा तुम्ही या घटनांच्या स्वरूपाकडे पाहता, तेव्हा हवामान बदलाचा यावर परिणाम होत असावा असा विचार नक्कीच येतो,’’ असे डॉ. कुक म्हणाले.
‘‘सरळ तर्क असा आहे की, पृथ्वी तापल्यामुळे हिमनद्या आकुंचन पावत आहेत आणि मोठ्या प्रमाणावर बर्फ वितळत आहे. ‘पर्माफ्रॉस्ट’ (शतकानुशतके गोठलेली माती) जी काही पर्वतांच्या उतारांना एकत्र बांधून ठेवते, ती आता गरम होत आहे, वितळत आहे आणि तिची गुणवत्ता ढासळत आहे. त्यामुळे पर्वतांचे हे उच्च भूप्रदेश हवामानाच्या उष्णतेमुळे शेवटी अस्थिर होत असल्यामुळे, भविष्यात अधिक दरडी कोसळणे, ढिगाऱ्यांचे लोट वाहणे, हिमनद्यांचे पाणी वितळणे, तलाव फुटणे आणि हिमनद्या कोसळण्याच्या घटना जास्त प्रमाणात पाहायला मिळतील," असे कुक यांचे म्हणणे आहे.
उत्तर भारतातील चमोली खोऱ्यात हिमालयीन हिमनदीचा एक मोठा भाग २०२१ मध्ये कोसळला होता, ज्यामुळे खाली ढिगारा आणि पाण्याचा प्रचंड लोट वाहून आला होता आणि त्यात २०० लोकांचा मृत्यू झाला होता.
नेपाळमध्येही, याच भागात गेल्या वर्षी तिबेटमधील एका हिम तलावाचा (ग्लेशिअल लेक) सांडवा फुटल्यामुळे पूर आला होता.
`इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट` (आयसीआयएमओडी) या आंतरसरकारी वैज्ञानिक संस्थेच्या विश्लेषणानुसार, उंच पर्वतीय भागातून बर्फ आणि खडकांचा प्रचंड लोट आला असावा. यामुळे भोटे कोसीची उपनदी असलेल्या लेंडे खोलामध्ये बर्फ आणि खडकांच्या ढिगाऱ्यांचा मोठ्या प्रमाणात शिरला आणि परिणामी नदीत पाण्याचा अचानक प्रवाह वाढून पाणी, गाळ आणि मोठे खडक प्रवाहाच्या दिशेने वाहून गेले. सुमारे ३० मिनिटांच्या कालावधीत नदीच्या सखल भागातील पाण्याची पातळी सात ते नऊ मीटरने वाढली, आणि अनेक जलप्रकल्प वाहून गेले किंवा त्यांचे नुकसान झाले, असेही `इंटरनॅशनल सेंटर फॉर इंटिग्रेटेड माउंटेन डेव्हलपमेंट`चे म्हणणे आहे.
‘आयसीआयएमओडी’मधील तज्ज्ञ मोहम्मद फारूक आझम यांनी सांगितले की, क्रायोस्फिअरमधील (पृथ्वीचा गोठलेला भाग) धोक्यांची वाढती वारंवारता पूर्वीपेक्षा अधिक स्पष्टपणे दिसून येत आहे. बदलाचा वेग इतका जलद आहे की सध्याचे उपाय आणि प्रयत्न अपुरे पडत आहेत.

हवामान बदलाचा परिणाम
हिमनदी नेमकी कशामुळे कोसळली हे अद्याप स्पष्ट नसले, तरी पण वाढत्या तापमानामुळे आणि हवामान बदलामुळे हिमालयातील बर्फ आणि ''पर्माफ्रॉस्ट'' (कायम गोठलेली जमीन) वितळत असल्याचा इशारा शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून देत आहेत.
या वर्षाच्या सुरुवातीला ‘आयसीआयएमओडी’द्वारे प्रसिद्ध केलेल्या एका विश्लेषणानुसार, हिंदूकुश हिमालयीन क्षेत्रातील हिमनद्यांमधील बर्फ इसवी सन दोन हजार पासून दुप्पट वेगाने वितळत आहे. यामुळे पुरासारख्या आपत्तींचा धोका अधिकच वाढत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Ganeshotsav: गणेशोत्सवासाठी मंडपात वीज कनेक्शन हवंय? BEST च्या ११ अटी पूर्ण करा, ELCB रिपोर्टही द्यावा लागणार, नवे नियम काय?

BEST Bus: रक्षाबंधनसाठी 'बेस्ट'ची मोठी भेट, मुंबईत १३६ जादा गाड्या चालवण्याचे नियोजन

Nashik Shalarth Scam: शालार्थ घोटाळ्याची ‘कागदपत्रे’ पोलिसांच्या रडारवर; ८२१ शिक्षक-कर्मचाऱ्यांच्या प्रस्तावांची शहानिशा

Marathi News Live Updates : नेपाळमधील अचानक आलेल्या पुरामुळे मृतांची संख्या २५८ वर पोहोचली

Ratnagiri Jan Suvidha: ‘जन’सह ‘नागरी’ सुविधांचा वेग वाढला निविदा-वर्कऑर्डर प्रक्रियेला गती; हजारावर कामे पूर्ण

SCROLL FOR NEXT