पुणे

ग्लोबल फ्लॉवर फेस्टिवल

CD

पुणे व इतर आवृत्यांसाठी लोगो - आणखी एक लोगो पीडीएफ व्हॉटस ॲप वर दिला आहे. प्रायोजक लोगो ः ६७८३१ पुष्प कलाकृती ः ६७८५५ कोल्हापुरात साकारणार जागतिक विक्रम! फुलांतील ‘श्री तिरुपती बालाजी’, ‘श्रीयंत्र’ ठरणार मुख्य आकर्षण ः ‘सकाळ’च्या ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हलमध्ये निसर्गसौंदर्य, संस्कृती आणि मनोरंजनाचा महासंगम! सकाळ वृत्तसेवा कोल्हापूर, ता. ४ ः महाराष्ट्रात प्रथमच आंतरराष्ट्रीय मानांकनाचा ‘सकाळ’ प्रस्तुत ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल कोल्हापुरात रंगणार आहे. कोल्हापूरच्या नवरात्रोत्सवाची फुललेली ऊर्जा अनुभवण्याची ही एक अनोखी पर्वणी ठरणार आहे. तब्बल साडेसात एकरांच्या विस्तीर्ण परिसरात बहरणाऱ्या या महोत्सवात १ कोटींहून अधिक फुलांचे नाविन्यपूर्ण सादरीकरण पाहायला मिळणार आहे. चाळीसहून अधिक फुलांचे क्रॉप्स, ३०० ते ४०० प्रकारच्या फुलांच्या जाती, हजारांहून अधिक रंगछटा, पन्नास प्रकारची गुलाबांची दालने आणि ३० ते ४० प्रकारचे जास्वंद, असा हा निसर्गरम्य माहोल ११ ऑक्टोबरपासून अनुभवायला मिळणार आहे. सलग नऊ दिवस चालणाऱ्या या निसर्गसोहळ्यासाठी ‘केएसबीपी’ हे नॉलेज पार्टनर असून, संकल्पना व अंमलबजावणी ‘ग्रीन आर्मी’ यांची आहे. जगातील सर्वांत मोठा ठरणारा हा महोत्सव ‘ब्लूम्स्बियॉन्ड बॉर्डर्स’ या संकल्पनेतून साकारणार आहे. नेदरलँड्स (हॉलंड), अमेरिका, जर्मनी, जपान, थायलंड, व्हिएतनाम, स्वित्झर्लंड आणि बेल्जियम आदी देशांतील फुलांच्या विविध दुर्मीळ प्रजातींचा महोत्सवात समावेश आहे. यासोबतच विविध राज्यांतून आणलेल्या कॅक्टस आणि सक्युलंटस्‌च्या प्रजाती, विविध प्रकारचे बोन्साय, मांसाहारी वनस्पती, कीटकभक्षी वनस्पती, औषधी व सुगंधी वनस्पती यांचे विशेष दालन येथे उभारण्यात येणार आहे. हौशी बागकामप्रेमींसाठी उपयुक्त प्रात्यक्षिके, पुष्प सजावटीच्या आंतरराष्ट्रीय कार्यशाळा, छायाचित्रकारांसाठी निसर्गाची विविध रूपे टिपण्याची संधी आणि विद्यार्थ्यांसाठी कल्पक स्पर्धांची रेलचेल येथे असणार आहे. ----- महोत्सवाची मुख्य वैशिष्ट्ये व विशेष आकर्षणे * प्रथमच वर्ल्ड रेकॉर्ड * भव्य कोल्हापुरी चप्पल व श्रीयंत्राची फुलांतील भव्य प्रतिकृती * कुस्ती व तालीम, अंबाबाई मंदिराची प्रतिकृतीच्या कलात्मक पुष्प रचना *नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम, कॉमेडी शो आणि विविध व्याख्याने * किड्स झोन व अम्युझमेंट पार्क * बागकाम सजावट वस्तू, गार्डन टूल्स, खते खरेदी * फुड स्टॉल्स * इन्‍स्टाग्राम स्पॉटस * तरूणाईसाठी खास सेल्फी व फोटो पाँईटस * चित्रकला स्पर्धा, फेस पेंटिंग, फॅशन शो, फोटोग्राफी स्पर्धा ---- चौकट १ : ६७८३३ चला, महोत्सवात सहभागी होऊया... महोत्सवाची उत्सुकता शिगेला पोहोचली असून, रात्रीच्या वेळी फुलांचे सौंदर्य अनुभवण्यासाठी ‘नाईट ब्लूम एक्सपिरियन्स’ची खास संकल्पना साकारली जाणार आहे. यामध्ये मनमोहक लाईट इफेक्ट्सच्या माध्यमातून वनस्पती व फुलांचे सादरीकरण केले जाईल. रात्रीच्या वातावरणात फुलांचा हा जादुई अनुभव घेण्यासाठी खालील क्यूआर कोड स्कॅन करून किंवा अधिकृत संकेतस्थळावरून तिकीट बुक करता येईल. अधिक माहितीसाठी संपर्क प्रतीक : ९१३०४४६५६६ ------- चौकट २ : ६७८३२ स्पर्धेत विनामूल्य सहभाग नोंदवा! महोत्सवांतर्गत आयोजित विविध स्पर्धांमध्ये सर्वांसाठी विनामूल्य प्रवेश आहे. यामध्ये ड्रॉईंग, सायन्स प्रोजेक्ट, फॅन्सी ड्रेस, फेस पेंटिंग, आर्टिस्टिक कॉम्पोझिशन, फॅशन शो, फ्लोरल रांगोळी, पेंटिंग व फोटोग्राफी स्पर्धांचा समावेश आहे. नोंदणीसाठी https://gff.events/competitions या संकेतस्थळाला भेट द्या किंवा क्यूआर कोड स्कॅन करा. चौकट ३ : ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल ः पिंपरी आणि पुणे येथे लवकरच! कोल्हापूरमधील या भव्य सोहळ्यानंतर निसर्गप्रेमींसाठी पर्वणी ठरणारा ‘ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल’ लवकरच पिंपरी आणि पुणे येथेही आयोजित करण्यात येणार आहे. पुणेकरांना व पिंपरी-चिंचवडकरांनाही लवकरच या आंतरराष्ट्रीय पुष्पोत्सवाचा आनंद घेता येईल. असा सजणार ग्लोबल फ्लॉवर फेस्टिव्हल कधी : ११ ते १९ ऑक्टोबर २०२६ कुठे : पोलीस उद्यान (ट्रॅफिक गार्डन परिसर, पोलिस मुख्यालयासमोर), कोल्हापूर वेळ : सकाळी ७ ते रात्री १० महोत्सवाचे प्रायोजक असे * पॉवर्ड बाय : मे. पुरुषोत्तम नारायण गाडगीळ सराफ आणि जव्हेरी * असोसिएट स्पॉन्सर्स : गोविंदराम शोभाराम ॲंड कंपनी (जी. एस. चहा), आविष्कार इन्फ्रा, नेक्सस इव्हेंट, तोडकर संजीवनी निसर्गोपचार केंद्र, ॲस्टर आधार हॉस्पिटल, रिलायन्स डिजिटल, श्री सदगुरू विश्वनाथ महाराज रुकडीकर ट्रस्ट (कोल्हापूर) हॉस्पिटॅलिटी पार्टनर : डी. वाय. पाटील ग्रुप

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Justice Ujjal Bhuyan: मतदानाचा हक्क काढून घेतला तर काय होईल? SIR प्रक्रियेवर न्यायमूर्ती उज्जल भुयान यांचे महत्त्वपूर्ण विधान

Latest Marathi News Live Update : घनसावंगी पंचायत समितीच्या कामांमध्ये दुमजली कामाचा स्लॅबचा कॉलम पडून मुजराचा मृत्यू

FlyDubai FZ1073 : अल कायदाचा फिदायीन होता फ्लायदुबईचा को-पायलट? कॅप्टन मच्छार यांना संपवून विमान इमारतीवर आदळवण्याचा होता कट, धक्कादायक खुलासा

बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका! वाघनाथ येथे बोअरवेल मशीन जप्त; यवतमाळ जिल्ह्यातील पहिली कारवाई

सायबर फसवणुकीसाठी बनावट खाती पुरवणाऱ्या टोळीला अटक; देशभरातील १९ नागरिकांची पावणेदोन कोटींची फसवणूक

SCROLL FOR NEXT